मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणे योग्य आहे का?

या उद्घाटन कार्यक्रमांतील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणे योग्य आहे का?
Narendra Modi, Yogi Adityanath, Shivraj Singh Chouhansarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मंगळवारी पूर्वांचल एक्स्प्रेस-वेचे उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमांतील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) एक्स्प्रेस-वेवर पायी चालत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांचाही एक व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. चव्हाण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणे योग्य आहे का असा सवाल काँग्रेसने केला आहे.

Narendra Modi, Yogi Adityanath, Shivraj Singh Chouhan
`चंद्रकांतदादांकडे लक्ष देण्याची गरज नाही.. पण फडणवीसही उथळ झालेत`

झाले असे की, पंतप्रधान सोमवारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भोपाळमध्ये आले होते. राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासहित अन्य नेते त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. दरम्यान, यावेळी पंतप्रधान प्रदर्शन पाहत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चालत असलेल्या चौहान यांना त्यांच्या सुरक्षारकाने रोखले. काँग्रेसने व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणे योग्य आहे का? असे विचारले आहे.

Narendra Modi, Yogi Adityanath, Shivraj Singh Chouhan
तुमचा मुलगा अमेरिकेत, आम्हाला बोलवा दंगलीच्या केस अंगावर घ्यायला : भाजपचे अनिल बोंडे झाले ट्रोल

काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनीही हा व्हिडीओ ट्वीट करत म्हटले आहे की, ''हे राम…मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा त्यांच्याच राज्यात असा अपमान? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच आपल्या सुरक्षारक्षकाला हे सर्व करण्यासाठी सांगितले असणार, अन्यथा कोणी मुख्यमंत्र्यांना कसे काय रोखू शकतो? असा आरोप त्यांनी केला आहे. तर याआधी जे पी नड्डांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी असेच केले होते असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस नेते अशोक बसोवा यांनी म्हटले आहे की, ''साहेब आणि फोटोंच्या मधे येण्यास मनाई आहे, मग ते मुख्यमंत्री का असोत? पहा शिवराज सिंग यांना''

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in