मोदी सरकारचा क्लिन चिटचा हिट फॉम्यूला! काँग्रेसनं थेट नाव-फोटोसह केलं जाहीर

काँग्रेसनं ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
PM Narendra Modi Latest News and Amit Shah Latest Marathi News
PM Narendra Modi Latest News and Amit Shah Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात ‘दिलासा घोटाळा’ हा शब्द राजकारणात प्रसिध्द झाला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उघडपणे भाजप नेत्यांना न्यायालयांकडून मिळणाऱ्या दिलासा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता काँग्रेसनं भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. क्लिन चिट का हिट फॉम्यूला हा हॅशटॅग करून मोदी सरकारने (Modi Government) नियुक्त केलेल्या विविध अधिकाऱ्यांची नावं उघड केली आहेत. (Congress Latest Marathi News)

काँग्रेसनं ट्विटरवर #क्लीन_चिट_का_हिट_फार्मूला हा ट्रेंड सुरू केला आहे. मोदी सरकारच्या क्लिन चिट फॉर्म्यूल्याची एक गोष्ट असं म्हणत विविध अधिकारी, न्यायाधीशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शहा (Amit Shah)भाजपच्या इतर नेत्यांना दिलेला दिलासा आणि त्यानंतर या अधिकाऱ्यांना मिळालेली पदं याबाबत नाव व फोटोसह माहिती दिली आहे.

PM Narendra Modi Latest News and Amit Shah Latest Marathi News
केजरीवालांचे ‘दिल्ली मॉडेल’ सिंगापूरला जाणार पण मोदी सरकारची परवानगी मिळेना!

आर. के. राघवन यांनी गुजरात दंगलीमध्ये मोदींना क्लिन चिट दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यानंतर त्यांना सायप्रसचे उच्चायुक्त बनविण्यात आले, असंही काँग्रेसनं म्हटलं आहे. गुलबर्ग सोसायटी नरसंहार आणि हरेन पांड्या प्रकरणात वाय. सी. मोदी यांनी नरेंद्र मोदींना क्लिन चिट दिली. नंतर ते एनआयएचे प्रमुख बनले, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

न्यायमूर्ती सुनिल गौर यांनी पी. चिदंबरम यांच्या अटकेसाठी मार्ग मोकळा केला. त्यानंतर ते पीएमएलएचे अध्यक्ष बनल्याचा आरोप करण्यात आला आहे. जस्टिस सदाशिवम यांनी तुलसी प्रजापती बनावट चकमकीत अमित शहा यांच्यावरील गुन्हा रद्द केला. त्यांना नंतर केरळचे राज्यपाल करण्यात आले. के. व्ही. चौधरी यांनी सहारा बिर्ला प्रकरणात मोदी आणि भाजपच्या अन्य नेत्यांना क्लिन चिट दिली. नंतर ते सतर्कता आयुक्त बनले, असा दावा काँग्रेसनं केला आहे.

दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी मोदी-शहा यांच्या इशाऱ्यावर अनेक प्रकरणात हस्तक्षेप केला. न्यायमूर्ती यू. यू. ललित हे सोहराबुद्दीन एनकाऊंटर प्रकरणात अमित शहांचे वकील होते. नंतर ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले, असं ट्विट काँग्रेसनं केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com