जनतेला वेडं बनवू नका : ६० दिवसात, पेट्रोल १० ने वाढवलं अन् आज ९.५० रुपयांनी कमी केलं

Congrees | Petrol | Diesel : पेट्रोल 9.5 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त
Nirmala Sitharaman and Rajnath Singh
Nirmala Sitharaman and Rajnath Singh Sarkarnama

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरून विरोधकांनी ओरड सुरू केली होती. अशातच आज मोदी (Narendra Modi) सरकारने महागाईवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपये कपात करण्यात आली आहे. (Petrol Diesel price hike News)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करुन ही घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपयांनी कमी करीत आहोत. यामुळे पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, याशिवाय एलपीजी गॅस सिलेंडरवरही २०० रुपये अनुदान देण्याची घोषणाही अर्थमंत्री सीतारमण यांनी केली आहे. (Petrol Diesel price hike News)

यानंतर काँग्रेसने या निर्णयावर उपरोधिकपणे टिका करत जनतेला वेडं बनवू नका असे म्हटले आहे. काँंग्रेस नेते रणदिप सुरजेवाल या निर्णयावर म्हणाले, माननीय अर्थमंत्री, आज पेट्रोलचे दर १०५ रुपये ४१ पैसे प्रतिलिटर दर आहे. तुम्ही म्हणाला, आजच्या घोषणेनंतंर पेट्रोल ९ रुपये ५० पैसे स्वस्त होईल. पण २१ मार्च २०२० म्हणजे ६० दिवसांपूर्वी पेट्रोलचा दर ९५ रुपये ४१ पैसे होता. म्हणजे मागच्या ६० दिवसांमध्ये तुम्ही १० रुपयांनी पेट्रोलचे दर वाढविले आणि आता ९ रुपये ५० पैसे कमी केले आहेत. जनतेला वेडं बनवू नका.

दरम्यान देशात महागाईचा भडका उडाल्याने मागील वर्षी वर्षी 4 नोव्हेंबरला मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली होती. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता.

पण या निवडणुका संपताच सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यावेळी पेट्रोल-डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली होती. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली आहे. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com