घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसनं टाकला डाव अन् भाजपचीही केली कोंडी

भाजपची कोंडी करण्यासाठी काँग्रेसनं टाकला डाव
Congress-BJP News
Congress-BJP NewsSarkarnama

जयपूर : राज्यसभा निवडणुकीमुळं वातावरण तापलं असून, राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. राजस्थानमध्ये भाजपने (BJP) उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांना पाठिंबा देऊन मैदानात उतरवलं आहे. यानंतर राज्यात घोडेबाजार सुरू होण्याची चर्चा सुरू झाली आहे. यानंतर तातडीनं काँग्रेसच्या (Congress) सगळ्या आमदारांना रिसॉर्टवर हलवण्यात आलं आहे. तरीही भाजपकडून घोडेबाजार होण्याची शक्यता गृहित धरुन काँग्रेसनं आता नवा डाव टाकला आहे. (Rajya Sabha Election News Updates)

काँग्रेसचे मुख्य प्रतोद व कॅबिनेट मंत्री महेश जोशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहिले आहे. घोडेबाजाराच्या प्रयत्नांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे काँग्रेससह इतर पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर घोडेबाजार करीत असल्याचा आरोप होत असलेल्या भाजपचीही कोंडी झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, राजस्थानमध्ये गेहलोत सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार सुरू असल्याची एफआयआर विशेष तपास पथकाकडे जोशी यांनी 2020 मध्ये दिली होती. यावरून मोठा राजकीय गदारोळ झाला होता.

जोशी यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, भ्रष्ट पद्धतीने आमदार अथवा मतदारांची खरेदी-विक्री अशा काळात होते हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक राज्यांत अशा निवणडुकांवेळी याला जोर चढतो. सोशल मीडियासह इतर माध्यमांमध्ये धनशक्तीचा वापर होत असल्याची चर्चा सुरू आहे. राजस्थानमधील राज्यसभा निवडणुकीतही असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. आमदारांची भ्रष्ट पद्धतीने खरेदी अथवा विक्री करणे हा घटनेनुसार गुन्हा आहे.

Congress-BJP News
महाडिकांच्या गळाला एकदम तीन आमदार? मतांच्या गोळाबेरजेसाठी थेट हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला

राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेसला तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी 15 मतांची आवश्यकता आहे. याचवेळी भाजपला एका जागेवर विजय मिळवून दुसऱ्या जागेसाठी 11 मतांची आवश्यकता असेल. चंद्रा हे भाजपच्या पाठिंब्यावर मैदानात उतरले असून, घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात 13 अपक्ष आमदार असून, छोट्या पक्षांचे 8 आमदार आहेत. त्यातील 12 अपक्षांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. काँग्रेसने आपले आमदार फुटू नयेत, यासाठी त्यांना जयपूरमधून उदयपूर येथील रिसॉर्टवर हलवलं आहे.

Congress-BJP News
भाजपनं उमेदवारच न दिल्याने राज्यसभेवर काँग्रेसचे दोन जण बिनविरोध

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) चार जागा आहेत. यातील दोन जागा काँग्रेस आरामात जिंकू शकते तर भाजपला एक जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. तिवारी यांच्या बाहेरचा असा शिक्का राज्यातील काँग्रेस नेते मारत आहेत. तिवारींच्या उमेदवारीबद्दल पक्षातील नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. यातच आता भाजपने सुभाष चंद्रा यांना पाठिंबा देत मैदानात उतरवून काँग्रेसला धक्का दिला आहे. चंद्रा हे झी माध्यम सूमहाचे मालक असून, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in