मुख्यमंत्री बदलणार? काँग्रेसच्या सर्व आमदारांना तातडीनं दिल्लीला बोलवलं

बैठकीत मुख्यमंत्री बदलावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.
Congress Chhattisgarh Crisis Deepens MLAs Called To Delhi
Congress Chhattisgarh Crisis Deepens MLAs Called To Delhi

नवी दिल्ली : काँग्रेसची (Congress) सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) आता मुख्यमंत्रिपदावरून (Chief Minister) सुरू असलेला संघर्ष वाढला आहे. या संघर्षावरून पक्षात फूट पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने पक्ष नेतृत्व सतर्क झाले असून नाराज नेत्यांची मनधरणी करण्यासाठी सर्व आमदारांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. या बैठकीत मुख्यमंत्री बदलावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले. (Congress Chhattisgarh Crisis Deepens MLAs Called To Delhi)

विद्यमान सरकारमधील आरोग्यमंत्री असलेले टी. एस. सिंहदेव (T.S.Singh Deo) यांनी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी सांगितली आहे. सिंहदेव आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) या दोघांनीही नुकतीच दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी दोघांमधील संघर्षातून मार्ग काढल्याचे वृत्त होते. सिंहदेव हे छत्तीसगडला परत गेलेले नाहीत. ते अडीच वर्षासाठी ठाम असल्याचं बोललं जात आहे. 

सिंहदेव यांच्या पवित्र्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. सिंहदेव हे बघेल यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार नाहीत. त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास ते मंत्रीपदाचा राजीनामा देतील. काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. अशा स्थितीत पक्षश्रेष्ठींकडून खबरदारी घेतली जात आहे. यापार्श्वभूमीवर सर्व आमदारांना शुक्रवारी दिल्लीत बोलावण्यात आले आहे. सिंहदेवही शुक्रवारी पुन्हा एकदा राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन राज्यात परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विमानतळावर घोषणाबाजीही करण्यात आली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची चर्चा घडवून आणणारे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते यात कधीही यशस्वी ठरणार नाहीत. मी आधीही सांगितले आहे की हाय कमांड आदेश देईल त्यावेळी राजीनामा देईन. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माझ्यासारख्या शेतकऱ्यावर सरकारची जबाबदारी टाकली आहे. मी याबाबत समाधानी आहे. हे सरकार शेतकरी, आदिवासी, कामगार आणि राज्यातील 2.8 कोटी जनतेचे आहे. 

राहुल गांधी यांनी बुधवारी (ता.25) बघेल आणि सिंहदेव यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या दोन्ही बैठका सुमारे तीन तास चालल्या. या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल आणि छत्तीसगडचे प्रभारी के.एल.पुनिया उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. यानंतर सिंहदेव यांनी बंडखोरीची तलवार म्यान केल्याचे समजते. पक्षांतर्गत मतभेदांवर उपाय काढण्यासाठी पक्ष नेतृत्व यापुढेही काही बैठका घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यातील मुख्यमंत्री बघेल सरकारने अडीच वर्षांचा कालावधी जून महिन्यात पूर्ण केला. यानंतर सिंहदेव आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्रिपदासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. राज्यात काँग्रेसची सत्ता डिसेंबर 2018 मध्ये आल्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता, असा दावा ते करीत आहेत. यावर बघेल यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अडीच वर्षांसाठी पदाचे वाटप आघाडी सरकारमध्ये असते. छत्तीसगडमध्ये मात्र काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असल्याचा युक्तिवाद बघेल यांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्रिपदाबाबत पक्ष नेतृत्वाचा निर्णय अंतिम असेल, असे सांगून त्यांनी या वादाचा चेंडू पक्ष नेतृत्वाच्या दरबारी टोलावला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com