'भारत जोडो' काँग्रेसला नवी उभारी देणार? राहुल गांधींच्या नेतृत्वात यात्रेला प्रारंभ

'भारत जोडो' राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) नेतृत्वातील यात्रा १२ राज्यातून जाणार
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatrasarkarnama

Rahul Gandhi : कन्याकुमारी : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या (Congress) बहुचर्चित कन्याकुमारी ते काश्मीर या 'भारत जोडो' (Bharat Jodo Yatra) यात्रेला आजपासून तमिळनाडूतून सुरूवात झाली. द्रमुकचे अध्यक्ष आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते राहुल गांधी यांना यावेळी प्रतिकात्मक राष्ट्रध्वज प्रदान करून या यात्रेला सुरूवात करण्यात आली. राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक म्हणून हा ध्वज राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्यात आला. यावेळी दोन्ही नेत्यांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केले.

सकाळी येथे आल्यानंतर स्टॅलिन यांनी राहुल यांचे स्वागत केले. गांधी स्मारक भवनामध्ये आयोजित कार्यक्रमाला देखील स्टॅलिन आणि राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी राजस्थान आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व भूपेश बघेल यांच्यासह तमिळनाडू काँग्रेस समितीचे अध्यक्ष के. एस. अळगिरीही उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी विवेकानंद शिला स्मारकालाही भेट दिली. रघुपती राघव राजाराम या गीतासह महाकवी भारती यांच्या गीताचे गायन करण्यात आले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या या यात्रेकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

Bharat Jodo Yatra
राहुल गांधींनी आपली भारत जोडो यात्रा पाकिस्तानात काढावी; भाजपचा टोला

या यात्रेला सुरूवात करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीरापेरम्बदूर येथील स्मारकाला अभिवादन केले. यावेळी राहुल यांच्या हस्ते स्मारकस्थळी वृक्षारोपणही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विटरवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, 'द्वेष आणि विभाजनाच्या राजकारणामुळे मी माझ्या वडिलांना गमावले आहे. आता मला माझा देशही गमवायचा नाही. द्वेषावर प्रेमाचा विजय होईल. भीतीला आशा पराभूत करेल, एकत्र येऊन आपण सगळे यावर मात करू', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) एक सूचक संदेश जारी केला आहे. मी पूर्ण भावनेने या यात्रेमध्ये सहभागी होत असून भारत जोडो यात्रा काँग्रेस पक्षासाठी एक ऐतिहासिक संधी आहे, मला पूर्ण विश्वास आहे की, यात्रेमुळे संघटनेमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होईल, असे त्या म्हणाल्या.

साठ कंटेनर दिमतीला

या दीडशे दिवसांच्या यात्रेदरम्यान राहुल गांधी हे कंटेनरमध्येच झोपणार आहेत. अन्य काही कंटनेरचाही या यात्रेत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये झोपण्यासाठीचे बेड, शौचालय आणि वातानुकूलित यंत्रणाही बसविण्यात आली. यात्रेसाठी साठ कंटेनर तयार करण्यात आले असून त्यामध्ये एक गाव सामावू शकते. या यात्रेच्या काळामध्ये राहुल गांधी हे कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार नाही. ते टेंटमध्येच नेत्यांसोबत भोजन घेतील, ते भोजनही सगळे नेते बनवतील. दरम्यान, काही राज्यांमध्ये प्रदेश काँग्रेसकडून नेत्यांच्या खानपानाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Bharat Jodo Yatra
नाना पाटेकरांच्या घरी मुख्यमंत्री शिंदे रमले तब्बल दीड तास; जेवण अन् रंगली गप्पांची मैफिल

लाखो लोकांना देशासाठी एकत्र आणावे लागेल

राष्ट्रध्वज आपल्यासाठी खूप काही आहे

तिरंगा हा राष्ट्रध्वज सहज मिळालेला नाही

आपला राष्ट्रध्वज प्रत्येक भारतीयाचे प्रतीक

सध्या राष्‍ट्रध्वजावरच हल्ला होतो आहे

प्रत्येक लोकशाहीवादी संस्थेवर हल्ला

काहींना राष्ट्रध्वज स्वतःची मालमत्ता वाटतो

तपास संस्थांना विरोधी नेते घाबरणार नाहीत

भाजपला देशाचे विभाजन करता येणार नाही

सध्या देश विनाशाच्या दिशेने जातो आहे

बेरोजगारी महागाईमुळे देशातील जनता त्रस्त

शेतकरी, कामगारांवर नियोजनबद्ध हल्ले, असा हल्लाबोल यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com