Congress : अधिवेशनात निलंबित झालेल्या रजनी पाटलांवर काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी..

Rajani Patil as whip of party in Rajya Sabha : रजनी पाटील यांच्या कथित बेशिस्तीचं प्रकरण हक्कभंग समितीकडं प्रलंबित आहे.
MP Rajani Patil
MP Rajani PatilSarkarnama

Rajani Patil as whip of party in Rajya Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्यावर काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे.

अर्थंसंकल्पीय अधिवेशनात निलंबनाची कारवाई झालेल्या रजनी पाटलांची राज्यसभा व्हीपपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते म्हणून प्रमोद तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी आनंद शर्मा होते, तर राज्यसभा गटनेतेपदी मल्लिकार्जुन खरगे हेच तूर्तास कायम आहेत.

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांचं अधिवेशन काळात निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.

रजनी पाटील यांच्या कथित बेशिस्तीचं प्रकरण हक्कभंग समितीकडं प्रलंबित आहे. मोदींच्या भाषणाच्या वेळी विरोधकांचा गोंधळ संसद टीव्हीने दाखवला नव्हता. पडद्यावर फक्त मोदीच होते. हे लक्षात आल्यावर काँग्रेसमधील एका खासदारानं शक्कल लढवली. त्याने रजनीताईंना काँग्रेस सदस्यांची घोषणाबाजी मोबाइलवर चित्रित करायला सांगितली. त्या सदस्याचं ऐकून रजनीताईंनी सगळा प्रकार चित्रित केला. चित्रीकरण होतंय हे भाजपच्या सदस्यांच्या लक्षात आलेलं होतं.

MP Rajani Patil
Gulabrao Patil : "मंत्रिपदाचा सट्टा लावून शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला.."; ठाकरेंना यामुळे सोडलं ; गुलाबराव पाटलांनी..

पण, राज्यसभेचं कामकाज संपेपर्यंत चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झालेली नव्हती. ती व्हायरल करण्याचं काम दुसऱ्या कोणी तरी केलं होतं, त्यामध्ये रजनीताईंचा हात नव्हता. दुसऱ्या दिवशी दुपारी रजनीताई सभागृहात बसल्या होत्या. आपल्याला निलंबित केलं जाईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. अचानक त्यांच्यावर कारवाई झाल्याची घोषणा झाली.

राज्यसभा सचिवालयानं संसदेतील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी निलंबित केल्यानंतर खासदार रजनीताई पाटील यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली होती. मी स्वातंत्र्यसैनिकांच्या घरातून येते, त्यामुळं मला अधिवेशनासाठीच काय तर संपूर्ण टर्म निलंबित केलं तरी चालेल, परंतु ज्या पद्धतीनं भाजपनं सभागृहात अपमान केलाय तो आम्ही सहन करणार नसल्याचं खासदार रजनी पाटील म्हणाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in