काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदेंवर आता टाकली मोठी जबाबदारी

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे.
congress appoints praniti shinde as screening committee member for kerala
congress appoints praniti shinde as screening committee member for kerala

नवी दिल्ली : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. काँग्रेसने केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेत्या व आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. 

केरळमध्ये डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटची (एलडीएफ) सत्ता आहे. विधानसभेच्या एकूण 140 जागा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये डाव्यांना 91 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 47 जागा अन् इतरांना दोन जागा मिळाल्या होत्या. भाजपला मात्र, राज्यात खाते खोलता आले नव्हते. या वेळी भाजपने जोर लावला आहे. 

काँग्रेसने आता केरळ विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी छाननी समिती जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यात सदस्यपदी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. याचबरोबर डुडिला श्रीधर बाबू यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे. पक्षाचे पदसिद्ध सदस्य म्हणून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रभारी तारिक अन्वर, मुलापेल्ली रामचंद्रन, रमेश चेन्निथला, ओमेन चंडी यांची निवड करण्यात आली आहे. 

तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम या राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एकूण 824 विधानसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत 18.68 कोटी मतदार आहेत. एकूण 2.7 लाख मतदान केंद्रे असणार आहेत. सर्व ठिकाणी सीएपीएफचा पुरेसा बंदोबस्त असणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रावरही सीएपीएफ तैनात असेल. सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांनी फ्रंटलाईन वर्कर मानले जाईल. 

यापैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. तर पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसची पाचपैकी एकाही ठिकाणी सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. पाचही ठिकाणी भाजप, काँग्रेससह स्थानिक प्रादेशिक पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. सभा, विविध विकासकामांचे उद्घाटन यांसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. 

निवडणूक तारखा : 
तमिळनाडू : एकाच टप्प्यात 6 एप्रिल  
पश्चिम बंगाल : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा  29 एप्रिल 
केरळ : एकाच टप्प्यात 6  एप्रिल, मल्लपुरम विधानसभा पोटनिवडणूक 6 एप्रिल  
आसाम : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल  
पुद्दुचेरी : एकाच टप्प्यात 6 एप्रिल 
सर्व राज्यांतील मतमोजणी : 2 मे 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com