राज्यसभेसाठी काँग्रेसकडून जयराम रमेश यांना उमेदवारी जाहीर

ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्याशी या विषयावर अगोदर चर्चा केली.
Jairam Ramesh
Jairam RameshSarkarnama

बंगळूर : राज्यसभेच्या (Rajya Sabha) निवडणुकीसाठी माजी मंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस (Congress) नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांना कर्नाटकातून (Karnataka) उमेदवारी देण्यात आली आहे. कर्नाटकात चार जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार कर्नाटकातून भारतीय जनता पक्षाचे दोघे, तर काँग्रेस पक्षाकडून एक जागा सहज जिंकू शकतात, पण चौथ्या जागेसाठी काँग्रेसला धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या पाठिंब्याची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाकडून डावपेच आखले जात आहेत. (Congress announces Jairam Ramesh's candidature for Rajya Sabha from Karnataka)

दरम्यान, माजी मंत्री रमेश हे येत्या ३० मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सध्या ते कर्नाटकातूनच राज्यसभेवर निवडून गेलेल आहेत. त्यामुळे पक्षाने रमेश यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Jairam Ramesh
तब्बल २३ वर्षांनंतर घरात मुलगी जन्माला आली; आमदार मोहितेंनी हेलिकॉप्टरमधून घरी आणले!

ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्याशी या विषयावर अगोदर चर्चा केली आहे. त्यानंतर काँग्रेसने आपल्या एका जागेसाठी जयराम रमेश यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार रमेश यांच्या नावाची पक्षाकडून घोषण करण्यात आली आहे. खासदार रमेश हे ३० रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Jairam Ramesh
काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवाराबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले....

कर्नाटक काँग्रेसचे विधिमंडळातील नेते सिद्धरामय्या यांनी येत्या ३० मे रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलाविली आहे. काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी प्रचंड चुरस होती. माजी मंत्री एस. आर. पाटील, दिवंगत माजी खासदार ऑस्कर फर्नांडिस यांच्या कुटुंबीयांची नावे समोर आली होती. तर काँग्रेसच्या एका गटाने प्रियांका गांधी यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे पक्ष कर्नाटकात कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याशिवाय, दुसरा जागा काँग्रेस लढवणार का आणि त्यासाठी कोणती रणनीती आखली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com