काँग्रेसचं अखेर ठरलं! प्रदेशाध्यक्ष अन् माजी मुख्यमंत्र्यांच्या गोटातील प्रत्येकी एक उमेदवार

दोन्ही गोटांतील एक-एक उमेदवार देऊन हाय कमांडनं काढला तोडगा
Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
Congress party Latest Marathi News, Political News Updates in MarathiSarkarnama

बंगळूर : आगामी विधान परिषद निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D.K.Shivkumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaih) हे आमनेसामने आले आहेत. यामुळं दोघांनाही दिल्लीत बोलावून पक्ष नेतृत्वानं उमेदवारी निश्चित केली. अखेर काँग्रेसनं सुवर्णमध्य साधत दोन्ही नेत्यांच्या गोटातील प्रत्येकी एकाला उमेदवारी दिली आहे. (Congress party Latest Marathi News)

कर्नाटकात विधान परिषदेच्या सात जागांसाठी 3 जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 224 आमदार हे मतदार असतील. विधानसभेत काँग्रेसचे 69 आमदार आहेत. यामुळे पक्षाचे दोन उमेदवार निवडून येणे निश्चित आहेत. भाजपचे 121 आमदार असून, त्यांचे 4 उमेदवार तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 32 आमदार असून, त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. राज्यातील पक्ष नेतृत्वाने हाय कमांडकडे शिफारस केलेल्या यादीवरून शिवकुमार आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यातील मतभेद समोर आले होते.

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
येडियुरप्पांना मोठा धक्का! भाजपनं मुलाचंच तिकीट कापलं

काँग्रेसनं एन. नागराजू यादव आणि अब्दुल जब्बार या दोघांना उमेदवारी जाहीर केली आहे. यादव हे सिद्धरामय्या यांच्या जवळचे मानले जातात. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री असताना यादव हे बंगळूर महानगर परिवहन महामंडळाचे 2016 ते 18 या कालावधीत अध्यक्ष होते. ते आता काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. जब्बार हे ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत. ते सिद्धरामय्या यांचे निकटवर्ती आहेत. सिद्धरामय्या यांनीच जब्बार यांची पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती.

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
शिवसेनेचं ठरलं; राज्यसभेसाठी संभाजीराजेंऐवजी कोल्हापुरातीलच संजय पवार

यातील चार जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी यादी जाहीर केली असून, यात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्ण सवदी, पक्षाच्या सरचिटणीस हेमलता नायक, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष चलवादी नारायणस्वामी आणि एस.केशवप्रसाद यांचा समावेश आहे. मात्र, यात येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र यांचे नाव नाही. मागील काही दिवसांपासून विजयेंद्र यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण ऐनवेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना तिकीट नाकारून येडियुरप्पांनाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या कोअर समितीने विजयेंद्र यांच्या नावाची शिफारसही करून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com