काँग्रेसचा स्वबळाचा निर्धार म्यान; 'आप' आणि 'तृणमूल'च्या नेतृत्वात लढणार

Congress | P. Chidambaram | Aam Aadmi Party : सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासार्ह नेत्याने दिली माहिती
Congress

Congress

Sarkarnama

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस (Congress) पक्षाने आपला स्वबळाचा निर्धार म्यान करत काही महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने त्या त्या राज्यांमध्ये ताकद असलेल्या पक्षांच्या नेतृत्वात लढण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहेत. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आप (AAP) आणि तृणमूलसोबतच्या (TMC) आघाडीत लहान भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेस जेष्ठ्य नेते पी. चिदंबरम यांनी याबाबत माहिती दिली.

'एनडीटीव्ही'या वृत्तवाहिनीशी बोलताना पी चिदंबरम म्हणाले, भाजपशी लढा राज्या-राज्यात होणार आहे. प्रत्येक पक्षाला काहीतरी जुळवाजुळव करावी लागणार आहे आणि हे तत्व ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनाही लागू होते. बंगालमध्ये तृणमूलच्या नेतृत्वात तर पंजाबमध्ये 'आप'च्या नेतृत्वात लढायचे आहे. भाजपशी राज्या-राज्यात लढलो तर त्यांचा पराभव करणे शक्य आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकीत भाजपला हरविण्यासाठी जुळवाजुळव करायची असल्यास आम्ही करू. आप आणि तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करू आणि त्या आघाडीत काँग्रेस लहान भावाची भूमिका स्वीकारण्यास तयार आहे असे पी चिदंबरम म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com