Sonia Gandhi & Hamid Ansari
Sonia Gandhi & Hamid AnsariSarkarnama

सोनिया गांधी अन् हमीद अंसारींवर भाजपचा गंभीर आरोप...

Sonia Gandhi| Hamid Ansari|BJP|Pakistan : भाजपने सोनिया गांधी अन् माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारींवर गंभीर आरोप केला आहे.

नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती महंमद हमीद अंसारी (Mohammad Hamid Ansari) व कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना भेटून आपण जी गोपनीय व संवेदनशील माहिती गोळा केली ती आपण 'आयएसआय' (ISI) या वादग्रस्त पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडे सोपविली, या पाकिस्तानी (Pakistan) पत्रकार नुसरत मिर्जा याच्या दाव्यावरून भाजपने (BJP) दोन्ही नेत्यांवर आज हल्लाबोल केला. या दोघांनी मिर्जा याला अशी कोणती माहिती दिली वा त्याने त्यांच्याकडून ती मिळविली हे राष्ट्रीय हितासाठी जाहीर करावे, असे भाजपने आव्हान दिले. देशाच्या जनतेने तुम्हाला सन्मान दिला, पण त्याबदल्यात तुम्ही देशाला काय दिले याचे आत्मपरीक्षण करा असाही सल्ला भाजपने दिला. (Sonia Gandhi & Hamid Ansari Latest Marathi News)

Sonia Gandhi & Hamid Ansari
केसरकरांना शिवसेनेचा इतिहास माहिती नाही; पवारांनी शिवसैनिकांचा स्वाभिमानच जपला...

अंसारी हे मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून सातत्याने सरकारच्या निशाण्यावर आले होते. राज्यसभाध्यक्ष म्हणून विधेयके (झटपट) मंजूर करण्यासाठी मला तुम्ही सहकार्य करत नाही, अशा शब्दांत खुद्द मोदी यांनी अंसारी यांच्याजवळ नापसंती व्यक्त केली होती. मात्र गोंधळ व गदारोळात सभागृहात विधेयके रेटून नेण्याचे प्रकार मी मान्य करणार नाही, यावर अंसारी खंबीरपणे अगदी अखेरपर्यंत ठाम राहिले. २०१७ मध्ये उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यावर त्यांनी केलेले काही गोप्यस्फोट व मते मोदी सरकारसाठी वेळोवेळी अडचणीची ठरली. या पार्श्वभूमीवर पाक पत्रकाराच्या ताज्या कबुलीने अंसारी व सोनिया यांच्या विरूध्द भाजपच्या हाती नवे हत्यार मिळाले आहे.

Sonia Gandhi & Hamid Ansari
Gotabaya Rajapaksa : कुठे आहेत श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजेपक्षे?

इतके गंभीर गुपित जगजाहीर झाल्यावरही कॉंग्रेस व विरोधक मूग गिळून बसले आहेत, असे भाजपने उपरोधिकपणे सांगितले. मिर्जा याला दोन्ही नेत्यांकडून काय काय माहिती देण्यात आली हे त्वरित जाहीर करावे, असाही इशाराही भाजपने दिला. अंसारी यापूर्वी इराकमध्ये राजदूत असतानाही त्यांनी देशाची गोपनीय माहिती तिकडे सार्वजनिक केल्याचा दावा विदेश व्यवहार मंत्रालयाच्या एका निवृत्त वरिष्ठाधिकाऱयाने यापूर्वी कला होता. त्याकडेही भाजपने लक्ष वेधले.

Sonia Gandhi & Hamid Ansari
`राणेंची मुलं लहान आहेत; त्यांना फडणवीस योग्य समज देतील...`

मिर्जा याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले होते की आपण ५ वेळा भारतात गेलो व अंसारी व सोनिया गांधी यांना भेटलो. या दोघांकडूनही आपल्याला जी गुप्त माहिती मिळाली ती आपण पाकमध्ये परतल्यावर वेळोवेळी 'आयएसआय'कडे सुपूर्त केली. मीर्जा याच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला. दहशतवाद संपविण्यासाठी तुमचे हेच धोरण सत्तेवर व उच्चपदावर असताना राहिले होते का, हा देशाच्या जनतेच्या मनातील सवाल आहे, असे भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी विचारले. ते म्हणाले की अंसारी यांना सतत १० वर्षे उपराष्ट्रपती म्हणून देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर असताना देशाच्या जनतेने तुम्हाला सन्मान दिला. पण त्याबदल्यात तुम्ही काय दिले, याचा विचार करा, असे भाटिया यांनी अंसारींना उद्देशून विचारले.

Sonia Gandhi & Hamid Ansari
नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभ वादात; हिसंक, आक्रमक सिंहाच्या रचनेवर आक्षेप

या पाक पत्रकाराला देशाच्या सुरक्षेच्या बाबतची संवेदनशील गोपनीय माहिती देण्याची ‘सूचना‘ तुम्हाला थेटपणे सोनिया गांधींकडून मिळाली होती का? असेही भाजपने अंसारींना विचारले आहे. मिर्जा याला भारतात निमंत्रण देऊन बोलावले जाते. इकडे त्याचे आदरातिथ्यही केले जाते. सत्तारूढ पक्षाच्या व घटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या पदावरील दोन मोठ्या नेत्यांना तो भेटत रहातो. कॉंग्रेसच्या राज्यात हे काय घडत होते हे त्या पक्षाच्या नेतृत्वाने देशाच्या जनतेसमोर स्पष्ट करावे, असेही भाटिया म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in