G 20 Summit 2023 : G 20 परिषदेचा समारोप; ब्राझीलकडे सोपवली 2024 च्या यजमानपदाची सूत्रे

Delhi News : भारताच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील प्रगती मैदानावर दोनदिवसीय G 20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी आफ्रिकन युनियनचा या गटात समावेश करण्यात आला.
G 20 Summit 2023 :
G 20 Summit 2023 :Sarkarnama

G20 Summit India: दिल्लीत आयोजित दोनदिवसीय G 20 शिखर परिषदेचा 'स्वस्ती अस्तु विश्व' म्हणजेच विश्वाच्या शांततेसाठी या प्रार्थनेने समारोप करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेचा समारोप केला. तसेच २०२४ मधील G 20 च्या अध्यक्षपदाची सूत्रे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवली.

शिखर परिषदेच्या समारोप समारंभात पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी G 20 शिखर परिषदेचा समारोप झाल्याचे घोषित करतो. एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एका भविष्याचा रोडमॅप आनंददायी असेल. 140 कोटी भारतीयांच्या वतीने आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद."मी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडे 2024 च्या G 20 चे अध्यक्षपद सोपवतो."

G 20 Summit 2023 :
Rishi Sunak Visit Akshardham Mandir : ऋषी सुनक सपत्नीक अक्षरधाम मंदिरात; स्वामीनारायण देवाचे घेतले दर्शन!

पंतप्रधान मोदी म्हणाले, "नोव्हेंबरपर्यंत जी 20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. या दोन दिवसांत तुम्ही अनेक गोष्टी आणि प्रस्ताव मांडले आहेत. त्या सूचना आणि त्याला गती प्रदान करण्याची जबाबदारी आमची असेल. आम्ही नोव्हेंबरच्या शेवटी G 20 चे दुसरे आभासी सत्र आयोजित करू. यामध्ये आम्ही या शिखर परिषदेदरम्यान ठरलेल्या विषयांचा आढावा घेऊ शकतो. या सर्व गोष्टींचा तपशील आमच्या टीमद्वारे तुम्हाला शेअर केला जाईल. तुम्ही सर्वजण आमच्याशी कनेक्ट राहाल, अशी आमची आशा आहे."

पीएम मोदींनी ट्विटरवर असेही लिहिले आहे की, "भारताने ब्राझीलला अध्यक्षपद सोपवले आहे. ते समर्पण, दूरदृष्टीने नेतृत्व करतील आणि जागतिक एकता तसेच समृद्धी वाढवतील. भारताने आगामी G 20 चे अध्यक्षपद सोपवले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ब्राझीलला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

G 20 Summit 2023 :
G20 Summit 2023 Expenses : दिल्लीतील जी20 चा खर्च तुम्हाला माहिती आहे का ?

ब्राझीलचे राष्ट्रपती झाले भावुक

"जेव्हा आम्ही महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो तेव्हा मी खूप भावुक झालो. माझ्या राजकीय जीवनात महात्मा गांधींना खूप महत्त्व आहे कारण मी अनेक दशके अहिंसेचे पालन केले आहे. कामगार चळवळीत मी अहिंसेने लढा दिला म्हणूनच महात्मा गांधींना आदरांजली वाहताना मी भावुक झालो," अशा भावना ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ यांनी व्यक्त केल्या.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in