सूर्यनमस्कारांची सक्ती इस्लामच्या नव्हे तर घटनेच्याही विरोधात : मुस्लिम बोर्डाची भूमिका

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे Muslim Personal Law Board महासचिव हजरत मौलाना खालिद सैफुल्‍लाह रहेमानी यांनी सूर्यनमस्कार Sun salute घालण्याच्या केंद्राच्या निर्देशास विरोध करणारा फतवा जारी करताना मुस्लिम विद्यार्थ्यांनी Muslim Students या मोहीमेत सहभागी होऊ नये असे निर्देश दिले आहेत.
सूर्यनमस्कारांची सक्ती इस्लामच्या नव्हे तर घटनेच्याही विरोधात : मुस्लिम बोर्डाची भूमिका

Muslim Personal Law Board

facebook

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळाशाळांमध्ये सूर्यनमस्कार घालण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशाला अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कडाडून विरोध केला आहे. हा उपक्रम राज्यघटनेच्या विरोधात आहे व सूर्यनमस्कार ही एक पूजा पध्दती आहे. इस्लाम कोणत्याही पूजा-अर्चेस मान्यताच देत नाही, असे मुस्लिम लॉ बोर्डाने म्हटले आहे.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव हजरत मौलाना खालिद सैफुल्‍लाह रहेमानी यांनी सूर्यनमस्कार घालण्याच्या केंद्राच्या निर्देशास विरोध करणारा फतवा जारी करताना मुस्लिम विद्यार्थ्यांनी या मोहीमेत सहभागी होऊ नये व सूर्यनमस्कारही घालू नयेत असे निर्देश दिले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त एक ते सात जानेवारी या काळात सर्व शाळांमध्ये सूर्य नमस्कार कार्यक्रमाची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार शाळांना यात सामील करून घेण्यात आले आहे. देशभरात १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक शाळेत असे साप्ताहिक कार्यक्रम करण्याची केंद्राची योजना आहे.

<div class="paragraphs"><p>Muslim Personal Law Board</p></div>
"एमआयएम'चे खालिद परवेज म्हणाले, "कॉंग्रेसने विश्‍वासघात केला'

मात्र, सूर्य नमस्कार हे पूजापध्दतीचेच रूप असून इस्लाम अशा कोणत्याही पूजेला मान्यता देत नाही. त्यामुळे मुस्लिम विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊ नये असेही रहेमानी यांनी फतव्यात म्हटले आहे. सूर्य हा देव व त्याच्या पूजेचा मार्ग सूर्य नमस्कार घालणे असे याचे स्वरूप आहे. मात्र, इस्लाम व भारतीय मुस्लिमही सूर्याला देव मानत नाहीत व त्याची पूजाही करणे धर्मतत्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे सरकारने हा आदेश मागे घेऊन देशाच्या धर्मनिरपेक्ष भावनेचा सन्मान करावा असेही लॉ बोर्डाने बजावले आहे.

<div class="paragraphs"><p>Muslim Personal Law Board</p></div>
अयोध्या निर्णयाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आव्हान देणार

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही भारतीय मुस्लिम समाजाची एक मोठी व प्रभावशाली संस्था असल्याने या संस्थेच्या ताज्या विरोधाला महत्व आले आहे. केंद्राचा हा कार्यक्रम, भारतीय नागरिकांना धार्मिक उपासना पध्दतीच्या स्वातंत्र्यास मान्यता देण्याच्या राज्यघटनेतील तत्वाच्याही विरोधात असल्याचे रहेमानी यांनी स्पष्ट केले आहे. भारत हा एक धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक व बहु सांस्कृतिक देश आहे. याच सिद्धांतांवर आमची घटना लिहिली गेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शालेय कामकाजाच्या आखमीतही याचे काटेकोर भान ठेवले गेले. मात्र, सूर्य नमस्कार घालण्याचा केंद्र सरकारचा ताजा आदेश घटनेच्या विरोधात आहे, असे रहेमानी यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in