Parliament building News : मल्लिकार्जुन खर्गे अन् अरविंद केजरीवालांना राष्ट्रपतींबद्दल केलेले वक्तव्य भोवणार; काय आहे प्रकरण?

Mallikarjun Kharge, Arvind Kejriwal News : नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २८ मेला होणार आहे.
Mallikarjun Kharge, Arvind Kejriwal
Mallikarjun Kharge, Arvind KejriwalSarkarnama

New Parliament building inauguration News : नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते २८ मेला होणार आहे. विरोधी पक्ष आणि सरकार या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर या उद्घाटन सोहळ्यावरुन टीका करत आहेत.

या वादातूनच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमासंदर्भात राष्ट्रपतींच्या जातीचा उल्लेख करून वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे केजरीवाल आणि खर्गे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

Mallikarjun Kharge, Arvind Kejriwal
Narhari Zirwal News : "सर्वोच्च न्यायालयाने तपास करूनच आपल्याकडे दिलं.." ; झिरवळांचा राहुल नार्वेकरांना चिमटा !

मल्लिकार्जुन खर्गे यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न केल्याबद्दल सरकारवर टीका केली होती. खर्गे यांनी एकापाठोपाठ एक 4 ट्विट करत सरकारला घेरले होते. ज्यामध्ये त्यांनी मोदी सरकार केवळ निवडणुकांसाठीच दलित आणि आदिवासींचा उपयोग करतात असे असा आरोप केला होता.

तर केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनीही आम्हाला अशुभ मानले जाते, म्हणूनच बोलावले जात नाही का, असा सवाल दलित समाज विचारत आहे? अशा शब्दात टीका केली होती.

Mallikarjun Kharge, Arvind Kejriwal
Sambhajiraje News : २०२४ च्या तयारीला लागा, राज्यात आपण सत्ता आणू शकतो; संभाजीराजेंने सांगितला मार्ग

यावरुनच समुदाय/गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याच्या उद्देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जातीचा उल्लेख करत प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी केजरीवाल आणि खर्गे यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलम 121,153A, 505 आणि 34 IPC अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली. राजकीय फायद्यासाठी सरकारवर अविश्वास निर्माण केल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com