अयोद्ध्येवरून येताना नीलम गोऱ्हेंनी दिल्या या ठिकाणांना भेटी

डॉ. नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) यांनी सामाजिक व ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देत महाराष्ट्रात येण्याचे ठरविले आहे.
अयोद्ध्येवरून येताना नीलम गोऱ्हेंनी दिल्या या ठिकाणांना भेटी
Nilam Gorhe News, Pune Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई - शिवसेनेचे युवा नेते तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल ( ता. 15 ) अयोद्धेचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्या बरोबर शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ( Nilam Gorhe ) याही होत्या. हा दौरा यशस्वी झाल्यावर परतीच्या मार्गावर असलेल्या डॉ. गोऱ्हे यांनी सामाजिक व ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देत महाराष्ट्रात येण्याचे ठरविले आहे. त्यानुसार त्यांचा सामाजिक दौरा सुरू झाला आहे. ( Coming from Ayodhya, Neelam Gorhe visited these historical places )

अयोध्या दौऱ्यात शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रामलल्लाच्या दर्शनानंतर अनेक ठिकाणी उत्साह आणि उत्सुकता पाहायला मिळाली. ठिकठिकाणी वटपौर्णिमाच्या निमित्ताने भंडारा आयोजित केल्याचे दिसून आले. त्यांच्या या दौऱ्याची सर्वत्र चर्चा सुरू असल्याने संपूर्ण वातावरण भारले गेले आहे. (Nilam Gorhe Latest Marathi News)

Nilam Gorhe News, Pune Latest Marathi News
राज्य सरकार अयोध्येमध्ये भव्य 'महाराष्ट्र सदन' बांधणार : आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा

या दौऱ्यात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सहभागी झाल्या आहेत. आज त्या लखनौ वरून कानपूर मार्गे झाशी येथे भेट देणार आहेत. झांशी येथे झांशीचे खासदार तथा उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष रघुनाथ (कक्काजी) धुळेकर यांच्या परिवारास भेट देणार आहेत. त्यांच्या सुनबाई आणि डॉ. गोऱ्हे यांच्या जवळच्या नातेवाईक डॉ. लता धुळेकर यांनी झाशीच्या राणीच्या जीवन कार्यावर पीएच. डी. केली आहे. त्यांच्याशी स्नेह संवाद करणार असून झाशीच्या राणीचे स्मारक, वस्तू संग्रहालय आणि इतर ठिकाणी डॉ. गोऱ्हे भेट देतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in