कॉमेडियन भारती सिंगच्या घरात सापडला गांजा...पतीलाही एनसीबीने घेतले ताब्यात - comedian bharati singh and her husband house raided by ncb | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

कॉमेडियन भारती सिंगच्या घरात सापडला गांजा...पतीलाही एनसीबीने घेतले ताब्यात

वृत्तसंस्था
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात बॉलीवूडमधील अमली पदार्थांचा वापर समोर आला होता. या प्रकरणी एनसीबीकडून जोरदार कारवाई सुरू आहे. 

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (एनसीबी) आज छापा घातला. त्यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला आहे. या दोघांना चौकशीसाठी एनसीबीने ताब्यात घेतले आहे. 

बॉलीवूडमधील अमली पदार्थांच्या वापराचा तपास एनसीबीकडून सुरू आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज सकाळी भारती सिंगच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घरावर छापा घातला. या छाप्यात गांजा जप्त करण्यात आला आहे. अतिशय कमी प्रमाणात हा गांजा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

एका अमली पदार्थ वितरकाच्या चौकशीत भारतीचे नाव समोर आले होते. एनसीबीने आज मुंबईत आणखी दोन ठिकाणी छापे घातले. भारती आणि तिच्या पतीला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. त्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात बॉलीवूडमधील अमली पदार्थांचा वापर समोर आला होता. याचा तपास एनसीबी करीत आहे. या प्रकरणी सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, सुशांतचे काही कर्मचारी आणि इतर काही जणांना एनसीबीने अटक केली होती. रिया चक्रवर्तीसह काही आरोपी हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. नंतर एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची चौकशी केली होती. 

या चौकशीत सर्वच अभिनेत्रींना ड्रग्जंसदर्भात चॅट केल्याची कबुली दिली होती. मात्र, ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार केला होता. या अभिनेत्रींनी केलेले व्हॉट्सअॅप चॅट हे त्यांच्याविरोधात ड्रग्ज घेतल्याचा पुरावा ठरू शकत नाही. यासाठी आणखी ठोस पुरावे एनसीबीला हवे होते. या चौकशीत केवळ सुशांतच्या ड्रग्ज सेवनाचे पुरावे समोर आले होते.

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख