सिसोदिया यांच्याकडे भाजप नेत्याचे 'ते' रेकॉर्डिंग

Manish Sisodia : आॅपरेशन लोटस दिल्लीत पूर्णपणे फेल...
Manish Sisodia Latest News
Manish Sisodia Latest Newssarkarnama

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना 'आप' (AAP) सोडून व तोडून भाजपमध्ये (BJP) आलात तर तुमच्याविरूद्ध तपास संस्थांची सर्व प्रकरणे संपतील' अशी आॅफर देणाऱ्या भाजप नेत्याच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे, असा खळबळजनक दावा सिसोदिया यांनी सांयकाळी केला. मात्र हे रेकॉर्डिंग तातडीने सार्वजनिक करण्यास 'आप'ची तयारी नाही. ‘योग्य वेळी सारे काही सांगितले जाईल' असे 'आप' नेते सांगत आहेत. मात्र या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आॅपरेशन लोट्स दिल्लीत पूर्णपणे फेल झाले, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विटद्वारे जाहीर केले. (Manish Sisodia Latest News)

Manish Sisodia Latest News
सिसोदियांना भाजपची ऑफर? : ‘आप' तोडून भाजपमध्ये या, तपास- चौकशांचा फेरा संपवा!

एका भाजप नेत्याने आपल्याशी संपर्क साधून ‘आप' पक्ष फोडला तर ईडी-सीबीआयच्या सर्व तपास संस्थांची कारवाई थांबेल. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीही करू, अशी आॅफर दिली होती,असा सिसोदिया यांनी दावा केला होता. त्यावर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ले चढविले होते. दिल्लीतील शिक्षण प्रणालीत सिसोदिया यांच्या नेतृत्वाखाली जो अमूलाग्र बदल झाला त्याची स्तुती करणारा लेख न्यू यॉर्क टाईम्समध्ये छापून आला. त्यामुळे मोदी सरकारने सिसोदिया यांना 'भारतरत्न' द्यायला हवे, अशी मागणी केजरीवाल यांनी केली असाही दावा भाजप नेत्यांनी केला होता. अरविंद केजरीवाल हे आपले राजकीय गुरू आहेत. आपण त्यांच्याशी कधीही गद्दारी करणार नाही, असे सिसोदिया यांनी सांगितले. ज्या भाजप नेत्याचा फोन सिसोदिया यांना आला त्याचे नाव जाहीर करा, असे आव्हान भाजपने दिले आहे.

Manish Sisodia Latest News
राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिली मोठी जबाबदारी

केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हणाले की, ईडी-सीबीआयने सिसोदिया यांच्या निवासस्थानी जे छापे टाकले त्यांचा व दिल्लीतील अबकारी धोरणाच्या चौकशीचा काहीही संबंध नव्हता का? केवळ दिल्लीतील आप सरकार पाडणे हाच या छापेमारीमागील खरा हेतू होता का? हेच प्रकार यांनी (भाजप) इतर राज्यांतही केले होते. मात्र दिल्लीत आॅपरेशन लोटस फेल झाले आहे, असा आरोप भाजपवर केला आहे.

Manish Sisodia Latest News
...तेव्हा फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर ‘करुणा’ दाखवली; मुख्यमंत्र्यांचा टोला!

दरम्यान, मी दिल्लीचा मुख्यमंत्री होण्यासाठी आलोच नव्हतो. देशातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळाले तरच भारत जगात नंबर १ देश बनेल. हे काम पूर्ण देशात फक्त केजरीवाल हेच करू शकतात, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com