पुण्यात प्रशिक्षित कर्नल कुटुंबासह पहिल्यांदाच चेक पोस्टवर गेले अन् घात झाला!

पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) प्रशिक्षण घेतले होते
Colonel Viplav Tripathi with Family
Colonel Viplav Tripathi with Family

नवी दिल्ली : मणिपूरमधील (Manipur) चुराचनपूर येथे शनिवारी माओवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल विप्लव त्रिपाठी (Colonel Viplav Tripathi) शहीद झाले आहे. या हल्ल्यात त्यांची पत्नी अनुजा (36) व पाच वर्षांचा मुलगा अबीर आणि आसाम रायफल्सचे चार जवानही शहीद झाले. कर्नल त्रिपाठी हे शनिवारी पत्नी व मुलासह पहिल्यांदाच चेक पोस्टवर गेले होते. पण त्यांचा हा चेक पोस्टवरील पहिला एकत्रित प्रवासच अखेरचा ठरला.

शहीद कर्नल यांचे आजोबा किशोरी मोहन त्रिपाठी हे स्वातंत्र्यसैनिक तसेच संविधान निर्मिती सभेचे सदस्य होते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कर्नल त्रिपाठी हे अत्यंत न्रम अधिकारी होते. ते नागरिकांची सतत मदत करत असत. त्यांचे मामा राजेश पटनायक यानी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी संपूर्ण कुटुंबाने मणिपूरमध्ये एकत्रित दिवाळी साजरी केली होती. तिथे विप्लव हेही होते. त्यांचे आई-वडील सहा नोव्हेंबर रोजी रायगडला परत गेले होते.

Colonel Viplav Tripathi with Family
मुख्यमंत्री म्हणतात, शेण अन् गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल!

विप्लव यांनी पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) प्रशिक्षण घेतले होते. तिथून ते डेहराडून येथील भारतीय सैन्य प्रबोधिनीत दाखल झाले. 2001 मध्ये त्यांना राणीखेत येथील कुमाऊं रेडिमेंटमध्ये लेफ्टनंद म्हणून नियुक्त करण्यात आले. शनिवारी सकाळी विप्लव हे पत्नी व मुलाला घेऊन पहिल्यांदाच चेक पोस्टवर गेले होते. तिथून परतत असताना माओवाद्यांना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अचानक हल्ला केला.

विप्लव हे दररोज चेक पोस्टवर एकटेच जात असत. हे त्यांचे दररोजचे काम होते. पण शनिवारी ते कुटुंबासह गेले होते. त्यांच्या ताफ्यातील पहिली गाडी स्फोटाने उडवण्यात आली. विल्पव हे त्यामागील गाडीत होते. माओवाद्यांनी मागील दोन्ही गाड्यांवर जोरदार गोळीबार गेला. कर्नल विप्लव व त्यांच्या पत्नीचा जागेवर मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विप्लव यांचे लहान बंधूही लष्करामध्ये आहे. त्यांचे वडील सुभाष त्रिपाठी हे वरिष्ट पत्रकार असून स्थानिक हिंदी दैनिकाचे संपादक आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शहीद जवानांचे बलिदान कधीच विसरले जाणार नाही, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com