मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी एकदा आईला भेटून ये ! : योगींना बहीणीची विनंती

भाऊ मुख्यमंत्री असला तरी शशि याचे उत्तराखंड येथे एक छोटे दुकान आहे. तीस वर्षापासून आपल्या मुख्यमंत्री भावाला राखी बांधली नाही,'' असे सांगताना त्यांचे अश्रू अनावर होतात.
मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी एकदा आईला भेटून ये ! : योगींना बहीणीची विनंती
Yogi Aadityanath News, Yogi Aadityanath's Sister Shashi Singh News, sarkarnama

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) मुख्यमंत्रीपदाची योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) दुसऱ्यांदा उद्या शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे त्यांची बहीण शशि सिंह (Shashi Singh) यांनी त्यांना एक भावुक विनंती केली आहे.

बहीणीने केलेली ही विनंती योगी आदित्यनाथ पूर्ण करतील का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यग्र कामातून वेळ काढून आपल्या आईची भेट घेत असतात, त्याचप्रमाणे योगी आपल्या आईच्या भेटीसाठी जाणार का असा प्रश्न उत्तरप्रदेश आणि उत्तरांखड येथील जनतेकडून विचारला जात आहे. (Yogi Aadityanath News)

shashi singh
shashi singh sarkarnama

''मु्ख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी एकदा आईला भेटून ये,'' अशी विनंती योगी आदित्यनाथ यांची लहान बहीण शशि सिंह यांनी त्यांना केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शशि सिंह भावुक झाल्या. यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले. भाऊ मुख्यमंत्री असला तरी शशि याचे उत्तराखंड येथे एक छोटे दुकान आहे. या दुकानाच्या माध्यमातून त्या आपल्या कुटुंबांची उपजीविका करीत आहेत.

Yogi Aadityanath News, Yogi Aadityanath's Sister Shashi Singh News,
मोठी बातमी : मुख्यमंत्री अडचणीत ; सोमय्यांनी ठाकरेंचा 'तो' फोटो केला व्हायरल

'तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे अन् तुम्ही एक दुकान चालवितात,' या प्रश्नाला उत्तर देताना शशि सिंह म्हणाल्या, ''दुसऱ्या पक्षात त्याप्रमाणे राजकीय वारसदार आहेत, त्यातील अनेक जण हे राजकारण आहेत, त्याप्रमाणे आमच्याकडे घराणेशाही नाही. माझा भाऊ म्हणतो, 'मेहनत करा, कमाई करा, अन् जीवन जगा'

''नोकरी करण्यासाठी योगी घराच्या बाहेर पडले. पण काही दिवसांनी आमच्या कुटुंबाला समजले की ते संन्यासी झाले. आजही ज्यावेळी मला साधु-संत दिसतात, तेव्हा मी त्यांच्यामध्ये माझ्या भावाला शोधत असते,'' असे शशि सिंह म्हणाल्या. ''योगी हे उत्तरांखडचे मुख्यमंत्री असते तर या राज्याचा खूप विकास झाला असता,' असेही त्या म्हणाल्या.

Yogi Aadityanath News, Yogi Aadityanath's Sister Shashi Singh News,
'आत्महत्या करेन,' असे म्हणणाऱ्या आव्हाडांना राणेंचा सल्ला ; 'कमी भ्रष्टाचार करा'

उत्तराखंडच्या पौड़ी गढ़वाल जिल्ह्यात पंचूर गावात अजय बिष्ट अर्थात योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी झाला. तरुणपणी अजय बिष्ट यांनी नोकरीसाठी घराबाहेर पडतो, असे कुटुंबियांना सांगितले. पण नोकरी न करता ते राममंदिर आंदोलनात सक्रीय झाले. महंत अवैद्यनाथ यांच्या संपर्कात आल्यानंतर योगींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. पुढे ते गोरखपूरच्या मठाचे प्रमुख झाले.

योगी आदित्यनाथ यांची बहीण शशि सिंह यांचे पंचूर गावापासून अडीच किलोमीटर अंतरावरील एका मंदीराजवळ दुकान आहे, त्या पतीसोबत रोज पायी त्या दुकानात जातात. २०१७च्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. तेव्हा शशि यांच्या दुकानाबाहेर प्रसारमाध्यमांचे कॅमेरे लागले. त्यानंतर त्या चर्चेत आल्या. ''तीस वर्षापासून आपल्या मुख्यमंत्री भावाला राखी बांधली नाही,'' असे सांगताना त्यांचे अश्रू अनावर होतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in