राज ठाकरेंच्या घोषणेनं 'यूपी'तही हादरे; योगींचं ठाकरे सरकारच्या पावलावर पाऊल

मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
Uddhav Thackeray, Yogi Adityanath
Uddhav Thackeray, Yogi AdityanathSarkarnama

लखनौ : मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला असून राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून महत्वाची पावले टाकली जात आहेत. हे वारं अन्य राज्यांमध्येही पोहचलं असून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारनंही मोठा निर्णय घेतला आहे.

ठाकरे सरकारने सर्व धार्मिक ठिकाणांना भोंग्यांची परवानगी घेणं बंधनकारक केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनीही त्याच पावलावर पाऊल टाकलं आहे. योगींनी गुरूवारी याबाबतची घोषणा केली. ते म्हणाले, परवानगीशिवाय धार्मिक ठिकाणांवर भोंग्यांचा वापर करता येणार आहे. तसेच परवानगी घेऊनही भोंग्यांचा आवाज मर्यादित हवा. नव्याने लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाणार नाही.

Uddhav Thackeray, Yogi Adityanath
राष्ट्रवादीचा दे धक्का; भाजपसह शिवसेना, एमआयएमचे नगरसेवक फोडले

प्रत्येकाला आपल्या पध्दतीनुसार पुजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण त्याचा इतरांना त्रास होऊ नये, असंही योगी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनीही भोंग्यांबाबत नियमावली तयार केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) मशिदी आणि मंदिरांना सुचना करण्यात आल्या असून दिलेल्या सुचनाचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या व नियमांचे पालन न करता बांधलेल्या मशिदी आणि मंदिरांना लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाणार नाही, तर रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करतील अशाच मंदिर व मशिदींना लाऊडस्पीकरला परवानगी दिली जाईल. तसेच ज्या धार्मिक संस्था सायलेंट झोनमध्ये नाहीत, त्यांनाच लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात येणार आहे, असे मुंबई पोलिसांकडून सष्ट करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray, Yogi Adityanath
कोल्हापूरात विरोधकांच्या तोंडाला फेस का आला? चंद्रकांतदादांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण

याबरोबरच लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद वा मंदिराची रचना कायदेशीर आहे की नाही हे देखील पाहिले जाणार असून बेकायदेशीर लाऊडस्पीकर आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 33w आणि 135 सह सर्व विद्यमान नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणारे लाऊडस्पीकर जप्त केले जाणार असून 12 हजार रुपयांच्या दंडाची तरतूदही केली जाईल, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com