मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही अयोध्या दौरा ठरला!

Shivsena | Uddhav Thackeray | Ayodhya : आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेही अयोध्या दौऱ्यावर जाणार!
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यापाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखील आता अयोध्या (Ayodhya Visit) दौऱ्यावर जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. या दौऱ्याची अद्याप तारिख निश्चित झालेली नसली तरीही शिवसंपर्क अभियानाची सांगता अयोध्येमध्ये होण्याची शक्यता आहे. शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात होणार आहे. याशिवाय १४ मे रोजी मुंबईतील बीकेसीमध्ये आणि ८ जून रोजी औरंगाबाद येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. यानंतर शेवटी ते अयोध्येचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्याआधी त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. याशिवाय राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या शिवसेना खासदार आणि प्रवक्त्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्याही अयोध्या दौऱ्याबाबतही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, प्रभू श्रीराम आम्हाला नेहमीच साद घालत असतात. आमचे आणि प्रभू श्रीरामाचे राजकीय नाते नाही. पण त्यांना बाबरीच्या बंदिवासातून मुक्त करण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. आम्ही अयोध्येला जाणार आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंच्या 'तुटून पडा' आदेशाला भाजपचे 'सडेतोड' उत्तर; केशव उपाध्येंची जहरी टीका

दरम्यान काल उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची आणि प्रवक्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे यांनी सर्व प्रवक्त्यांना राज ठाकरेंवर आणि भाजपवर तुटून पडा असे आदेश दिले आहेत. बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? राम मंदिर यात्रेवेळी राज ठाकरेंचे काय सुरु होते? त्यांचं हिंदुत्व किती बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा, सडेतोड उत्तर द्या, असे स्पष्ट आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय बैठकीत शिवसंपर्क अभियान आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली आहे.

Uddhav Thackeray
"राज ठाकरेंवर तुटून पडा" : शिवसेना प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंचा स्पष्ट आदेश

हे नेते बैठकीसाठी उपस्थित

खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, सचिन आह्रिर, सुनील प्रभू, किशोरीताई पेडणेकर, शितल म्हात्रे, शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंदराव दुबे, किशोर तिवारी, हर्षल प्रधान, विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, अनिल देसाई, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, भावना गवळी, श्रीकांत शिंदे हे नेते बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com