भाजपच्या राज्यात आता मोहाची दारू पिऊन 'झिंग झिंग झिंगाट'! मुख्यमंत्र्यांची घोषणा

काही दिवसांपूर्वीच महिलांसाठी स्वतंत्र वाईन शॉपची घोषणा करण्यात आली आहे.
BJP
BJPsarkarnama

भोपाळ : महिलांसाठी स्वतंत्र वाईन शॉपच्या घोषणेनंतर मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) आता मोहापासून (Mahua) तयार केली जाणारी दारू अधिकृत केली जाणार आहे. त्यासाठीचे धोरण तयार केले जात असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी केली आहे. ही दारू दुकानांमध्ये हेरिटेज दारू म्हणून विकली जाईल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

चौहान यांनी एका कार्यक्रमात बोलताना आदिवासी समाजाला हे आश्वासन दिलं. ते म्हणाले, आदिवासींनी मोहापासून तयार केलेल्या दारूला अधिकृत दर्जा देण्याचे धोरण तयार केले जात आहे. मोहापासून जर पारंपरिक दारू तयार केली जात असेल तर त्याची दुकानांमधूनही विक्री केली जाईल. आदिवासी बांधवांना रोजगाराचे साधन म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

BJP
एनसीबीची मोठी छापेमारी : नांदेड, जालना, औरंगाबादसह काही जिल्हे काढणार पिंजून

चौहान एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी ही दारू हेरिटेज दारू या नावाने विकली जाईल, असंही सांगितले. या दारूला अधिकृत मान्यता देण्याबाबतचे धोरण लवकरच आणले जाईल, अशी घोषणा चौहान यांनी केली. चौहान यांनी या धोरणाचा मसूदा तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार हे धोरण लवकरच मंत्रिमंडळात मंजूर केले जाण्याची शक्यता आहे.

याआधी राज्य सरकारने महिलांसाठी स्वतंत्र वाईन शॉप सुरू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एप्रिल २०२२ पासून सुरू होऊ शकते. सुरूवातीला ही दुकाने भोपाळ, जबलपूर, इंदौर आणि ग्वाल्हेरमध्ये उघडण्याबाबत सांगण्यात आले आहे. या दुकानांमध्ये महिलांच्या आवडीचे मद्याचे सर्व प्रकार असतील. ही दुकाने मॉलसारख्या सुरक्षित ठिकाणी उघडण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, मोहापासून बनवलेल्या दारूला अधिकृत करण्याचे धोरण कधीपर्यंत येणार, याबाबत स्पष्टता नाही. पण एप्रिल २०२२ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते, अशी चर्चा आहे. या दारूची स्वतंत्र दुकाने असणार की इतर दुकानांमध्ये मिळणार, याबाबतही अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण चौहान यांच्या या घोषणेची राज्यभर जोरदार चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com