मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांवर हल्लाबोल...भ्रष्टाचारी, जैन हवाला प्रकरणात त्यांचं नाव!

निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री विरूध्द राज्यपाल असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
CM Mamta Banerjee attacks on Governor Jagdeep Dhankhar
CM Mamta Banerjee attacks on Governor Jagdeep Dhankhar

कोलकता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसविरूध्द भाजप असा सामना पाहायला मिळाला. पण निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री विरूध्द राज्यपाल असा संघर्ष पाहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. (CM Mamta Banerjee attacks on Governor Jagdeep Dhankhar)

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुढील काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून आला. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसनेच घडवून आणल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. राज्यपाल जगदीप धनखर यांच्याकडूनही सातत्याने राज्य सरकारला जबाबदार धरले जात आहे. ते सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करत आहेत. तसेच तृणमूलच्या नेत्यांकडून राज्यपालांवर आरोप केले जात आहेत.

आज ममतांनी राज्यपालांचा उल्लेख थेट भ्रष्टाचारी असा केला आहे. राज्यपालांचं नाव 1996 मधील जैन हवाला प्रकरणात होतं, असा दावा त्यांनी केला. तेच त्यांना हटवण्यासाठी आपण तीन वेळा पत्रव्यवहार केल्याचंही ममतांनी सांगितलं. आमच्या सरकारला मोठं बहुमत मिळूनही ते एकाधिकारशाही का गाजवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळं दोघांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ममता सरकारकडून विधानसभेत राज्यपालांना हटवण्याबाबत ठराव मंजूर करण्याची शक्यता आहे. येत्या दोन जुलै रोजी विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशन हा ठराव मांडला जाईल, असे सुत्रांकडून सांगितलं जात आहे. या मुद्यांवर सरकारमध्ये खलबतं सुरू असून ममतानी विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांच्याशीही चर्चा केल्याचं समजतं. बिमन बॅनर्जी यांनीही लोकसभा अधयक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राज्यपालांची तक्रार केली आहे. 

राज्यपाल जगदीप धनखर हे काही दिवसांपूर्वीच दिल्लीत जाऊन आले आहेत. त्यांनी तिथं दोनवेळा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही ते भेटले. या भेटीनंतर ते थेट उत्तर बंगालच्या दौऱ्यावर आठ दिवसांसाठी गेले. तिथून ते नुकतेच परतले असून लगेचच राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यात लोकशाही नसल्याचा आरोपही त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com