Presidential Elections 2022: ममता बॅनर्जींनी बोलवली देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक

Presidential Elections 2022| Mamata Banerjee | देशात राष्ट्रपती पदासाठी 18 जुलैला मतदान प्रक्रिया होणार असून 21 जुलैला निकाल जाहीर होणार आहेत.
Presidential Elections 2022: ममता बॅनर्जींनी बोलवली देशातील  प्रमुख विरोधी पक्षांची बैठक
Mamata Banerjee latest news

Presidential Elections India 2022 तLatest news

नवी दिल्ली : देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. देशातील सर्वात मोठे संवैधानिक पद असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Elections India 2022) रणसंग्राम सुरू झाला आहे. निवडणूक आयोगानेही तारखा जाहीर केल्या असून त्यानुसार 18 जुलैला मतदान आणि 21 जुलैला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29जून आहे.

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सक्रिय झाल्या आहेत. देशातील 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी पत्र लिहून 15 जूनला दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होणार आहे.

Mamata Banerjee  latest news
औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देणार? ज्योतिरादित्य शिंदेंनीच सांगितलं

ममता बॅनर्जी यांनी डाव्या पक्षांसह देशातील प्रमुख विरोधी पक्ष आणि देशातील सर्व बिगर भाजप मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या बैठकीला आमंत्रित केलं आहे. यासाठी त्यांनी एक निवेदनही जारी केले आहे. "राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आल्याने, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फुटीरतावादी शक्तींविरूद्ध जोरदार आणि प्रभावी निषेधाच्या पुढाकाराने, विरोधी मुख्यमंत्री आणि नेत्यांशी संपर्क साधला आहे. याच अनुषंगाने बुधवार, 15 जून रोजी दुपारी 3 वाजल्यापासून कॉन्स्टिट्युशन क्लब, नवी दिल्ली येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सभेला उपस्थित राहण्यापासून टाळाटाळ केली आहे. उद्धव ठाकरे यांचा १५ जूनचा कार्यक्रम आधीच ठरलेला असल्याने ते या बैठकीला जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बाजूने या बैठकीला कोण जाणार, हे अद्याप जाहीर झालेले नाही. तसेच विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी ज्याचे नाव निश्चित होईल त्याला पक्ष पाठिंबा देईल, असेही शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

Mamata Banerjee  latest news
कृषि टर्मिनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार

ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या बैठकीसाठी ज्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

ज्या नेत्यांना आमंत्रण पाठवले आहे त्यांची नावे-

1- केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन

2- ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक

3- तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर

4- तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन

5- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

6- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

7- झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन

8- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

9- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष

10- RJD नेते लालू प्रसाद यादव

11- CPI सरचिटणीस डी. राजा

12- समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव

13- NCP नेते शरद पवार

14- RLD नेते जयंत चौधरी

15- JDS नेते HD कुमारस्वामी

16- JDS नेते HD देवेगौडा-

17- राष्ट्रीय परिषद फारुख अब्दुल्ला

18- नेता- पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती

19- अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल

20- एसडीएफ अध्यक्ष पवन चामलिंग

21- आययूएमएल अध्यक्ष केएम केदार मोहिद्दीन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in