मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; "अमरावती आणि हिंगोलीच्या समस्या सोडवा"

Eknath Shinde | Delhi | : आता लिखाण काम बंद, आता आपण थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून आदेश देणार
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. शपथविधीनंतरचा दोघांचाही हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात काल संध्याकाळी त्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तर आज सकाळी त्यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. ते आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा हा भेटी-गाठींचा दौरा सुरु असतानाच महाराष्ट्रात तुफान पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती तयार झाली आहे. तर अमरावती जिल्ह्यात दुषित पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले होते. ही गोष्ट लक्षात येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवासात गाडीमधूनच तात्काळ संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांच्या मदतीचे आणि समस्या सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतची एक व्हिडीओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला आलेल्या पूराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे घेतली. आपद्ग्रस्तांची सर्व व्यवस्था करावी तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही यास प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोबतच अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने ५० जणांची प्रकृती खराब झाली. या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घेतली. या सर्वांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या या कृतीनंतर त्यांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभेत सरकारचा विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे यांनी आता लिखाण काम बंद. आता आपण थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून आदेश देणार असल्याचे सांगितले होते. तपासून अहवाल सादर करा या प्रक्रियेत वेळ जातो, आता थेट कार्यवाही करा असेही आदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे शिंदे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com