Shiv Sena : एकनाथ शिंदेनी दिल्लीत बसून घातला शेवटचा घाव; शिवसेनेवर ठोकला दावा

एकनाथ शिंदे हे जवळपास 20 तास महाराष्ट्र सदनात बसून होते.
Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अखेरचा घाव घातल्याचे समजते. शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेत थेट शिवसेना व धनुष्यबाणावरच दावा ठोकल्याचे समजते. मंगळवारी सायंकाळी शिंदे गटाकडून याबाबतचे पत्र आयोगाला देण्यात आले आहे. (Shiv Sena Latest Marathi News)

शिवसेनेतील (Shivsena) बारा खासदार मंगळवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाले. त्यानंतर बारा खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनीही शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. तर राज्यातील 40 आमदारही शिंदे यांच्यासोबत आहेत. अनेक पदाधिकारी, नगरेसवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
Shiv Sena News : शिंदे गटातील 37 बंडखोर आमदारांचा पराभव होणार?

शिंदे गटाने नुकतीच जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यामध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना कायम ठेवण्यात आले आहे. पण त्यांच्यासोबत असलेल्या इतर सर्व नेत्यांना बाजूला केले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून शेवटचा घाव घालण्यात आला आहे.

शिंदे गटाने मंगळवारी सायंकाळी उशिरा निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याचे वृत्त टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिले आहे. आपल्याकडे चाळीस आमदार, बारा खासदार आहेत. तसेच गटाने नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. त्यामुळे आमच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळावे, तसेच हाच गट शिवसेना असल्याचा दावा आयोगाला दिलेल्या पत्रात करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
Yogi Government : योगी सरकारमधील दोन मंत्री नाराज; अमित शहांकडे करणार तक्रार

आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या चार महत्वाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. त्याआधीच शिंदे गटाकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे. आधी राष्ट्रीय कार्यकारिणी, नंतर लोकसभेत बारा खासदारांचा स्वतंत्र गट आणि आता आयोगाला पत्र देत शिंदे गटाने आपली बाजू भक्कम केली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in