महाराष्ट्रातील गोंधळ संपवून नवीन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शनिवारी दिल्लीत मुजरा...

Eknath Shinde | Devendra Fadnavis : नव्या मंत्र्यांची नाव ठरवूनच महाराष्ट्रात परतणार?
Eknath Shinde and Devendra Fadnavis
Eknath Shinde and Devendra Fadnavis Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या एका महिन्यात मोठी उलथापालथ झाली. आधी राज्यसभा निवडणूक, मग विधानपरिषद निवडणूक आणि अखेरीस एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) बंड या सगळ्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार जावून स्वतः शिंदे मुख्यमंत्रीपदी आले. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी आले. या नवीन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकून कामाला देखील सुरुवात केली.

दरम्यान मागील महिन्याभरापासूनचा हा गोंधळ संपल्यानंतर उद्या नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत. शनिवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच या भेटीत पुढील आठवड्यात होण्याऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होणार असल्याची माहिती आहे. पदभार स्विकारल्यानंतर या दोघांचाही हा पहिलाच दिल्ली दौरा असणार आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
ज्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात रामायण घडले ते उद्या अधिकृत आमदार होणार...

दरम्यान नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी कार्यक्रम १२ किंवा १३ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि त्यानंतर १८ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार आहे. या दोन्हीतील मुहूर्त साधत अधिवेशनापूर्वी या नव्या मंत्र्यांना पदभार स्विकारावा लागणार असल्याची चिन्ह आहेत. नव्या मंत्रीमंडळात (Bjp) भाजपचे २५ ते ३० मंत्री तर एकनाथ शिंदे गटाचे १४ ते १५ मंत्री असतील असे बोलले जात आहे.

भाजपचे संभाव्य मंत्री..

भाजपच्या मंत्रीमंडळातील संभाव्य आमदारांची नावे समोर येत आहेत, यात प्रामुख्याने गणेश नाईक, रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, नितेश राणे, आशिष शेलार, संजय कुटे, मदन येरावार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संदीप धुर्वे, रणजीत सावरकर, अतुल सावे, संभाजी निलंगेकर, राणा जगजीतसिंह पाटील, मेघना बोर्डीकर,चंद्रकांत पाटील, राहुल कुल, महेश लांडगे, जयकुमार गोरे, राम सातपुते, रणजीत मोहिते पाटील, सुभाष देशमुख, विजय देशमुख, गोपीचंद पडळकर,गिरीश महाजन, जयकुमार रावल, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे यांचा समावेश होऊ शकतो.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
CM Eknath Shinde: फडणवीसांनी हाताला धरुन शिंदेंना मुख्यमंत्र्यांंच्या खुर्चीत बसवले...

शिंदे गटातून यांची नावे चर्चेत

तर शिंदेगटातून स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह अनिल बाबर, शंभुराज देसाई, संजय शिरसाट, तानाजी सावंत, दिपक केसरकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, सदा सरवणकर, प्रकाश अविटकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शहाजी बापू पाटील, बच्चू कडू, भरत गोगावले, राजेंद्र यड्रावकर, लता सोनवणे, मंजुळा गावीत यांच्या नावांचा देखील विचार होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in