नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची शहांकडे १२०० कोटींची मागणी

राज्यातील आणि नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती आणि नक्षलग्रस्त भागांत ज्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आणि त्यासाठी लागणारा खर्च याची सविस्तर आकडेमोड मुख्यमंत्री ठाकरे यांनी अमित शहांसमोर मांडली.
Cm Uddhav Thackeray - Amit Shah
Cm Uddhav Thackeray - Amit Shah Sarkarnama

CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणूकांनंतर (Assembly elections) शिवसेना (Shivsena) भाजपापासून (BJP) विभक्त झाली. त्यानंतर केंद्रातील भाजप आणि शिवसेनेतील दुरावाही महाराष्ट्रातील जनतेने पाहिला. मात्र अनेक दिवसांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) हे दोघेही नक्षलग्रस्त भागांमधील विकासाच्या बैठकीनिमित्त एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीत राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Cm Uddhav Thackeray - Amit Shah
आमदार काबळेंचा खुलासा; ‘ती’ क्लिप माझी नाहीच पोलीस तपासात सत्य समोर येईल

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा विकास आणि नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी अमित शहांकडे १२०० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील नक्षलग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, राज्यातील आणि नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती आणि नक्षलग्रस्त भागांत ज्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आणि त्यासाठी लागणारा खर्च याची सविस्तर आकडेमोड मुख्यमंत्री ठाकरे यांनी अमित शहांसमोर मांडली.

त्याचबरोबर, नक्षलग्रस्त भागांमधील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी त्या भागात शाळा कशा वाढवणे, नक्षलग्रस्त भागात सुरक्षा आणि पोलीस यंत्रणांना काम करताना अडचणी येऊ नयेत यासाठी त्या भागात मोबाईल मनोऱ्यांची उभारणी करणे, यासह इतर महत्त्वाच्या गोष्टीबाबत माहिती दिली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस महासंचालकही यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात गडचिरोली आणि चंद्रपूर हे भाग नक्षलग्रस्त आहेत. या भागांत विकास कामांना गती देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकार प्रयत्न करणार आहे. मात्र राज्यसरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या शहरांमध्ये नक्षलवादाची समस्या निर्माण होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. नक्षलवादासारख्या मुद्द्यावर केंद्रसरकार आणि राज्यांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्राकडून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं होतं.

या बैठकीसाठी देशभरातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडीवर चर्चा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र, बैठक संपताच मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाल्याचे समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com