धक्कादायक : इच्छामरण हवंय...छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचं थेट राष्ट्रपतींना पत्र

नंद कुमार बघेल यापूर्वी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते.
Nand Kumar Baghel
Nand Kumar BaghelSarkarnama

नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या वडिलांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहित इच्छामरणाला परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांचे वडिल नंद कुमार बघेल (Nand Kumar Baghel) यापूर्वी अनेकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांना या प्रकरणात अटकही करण्यात आले होते.

नंद कुमार बघेल हे राष्ट्रीय मतदाता जागृती मंचाचे अध्यक्ष आहेत. देशात मतपत्रिकांचा वापर करून निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी त्यांनी काही वर्षांपासूनच मागणी आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. मतपत्रिकांचा वापर करून निवडणुका घ्या, अन्यथा आपल्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

Nand Kumar Baghel
इतना सन्नाटा क्यों है भाई? विरोधकांवर जहरी टीका करणाऱ्या राणे बंधूंना झालंय काय?

येत्या 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदाता दिन आहे. या दिवशी इच्छामरणाला परवानगी द्यावी, असं त्यांनी पत्राल म्हटलं आहे. नागरिकांच्या संविधानिक अधिकारांचे व्यापक स्तरावर हनन होत आहे. लोकशाहीचे स्तंभ उद्धस्त होत आहेत. माध्यमेही इतर तीन स्तंभांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. नागरिकांचे कोणीही ऐकून घेत नाही. मतदार आपल्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवडून देतात. पण मतदात्यांचा आवाज सतत दाबला जात आहे, असंही बघेल यांनी पत्रात नमूद केलं आहे.

लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार मतदान (Voting) हा आहे. मतदानाच्या अधिकार ईव्हीएम मशिनद्वारे पार पाडला जात आहे. ईव्हीएम मशीनला कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था किंवा सरकराने 100 टक्के योग्यपध्दतीने काम करणारे मशिन म्हणून परवानगी दिलेली नाही. पण त्यानंतर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात मतदानासाठी या मशिनचा वापर करून माझ्या मतदानाच्या अधिकाराचे हनन केले जात आहे. मतपत्रिका ही मतदानाची सर्वात विश्वसनीय पध्दत आहे, असे बघेल यांनी स्पष्ट केलं आहे.

Nand Kumar Baghel
उपमुख्यमंत्री भडकले; माईक फेकून देत पत्रकाराचा मास्क ओढला अन् व्हिडीओच केला डिलीट

माननीय राष्ट्रपती आपण संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतली आहे. पण माझ्या संविधानिक अधिकारांचे रक्षण होत नाही. त्यामुळे मला इच्छामरणाशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. त्यामुळे स्वस्थ लोकशाहीच्या व्यापक हिताच्यादृष्टीने मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचे आदेश द्यावेत, ही विनंती आहे. ईव्हीएमच्या जागी मतपत्रिकांद्वारे मतदान शक्य नसल्यास मला 25 जानेवारी यादिवशी इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी बघेल यांनी पत्राद्वारे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com