पंजाबमधील संकटाचे राजस्थानात धक्के; मुख्यमंत्र्यांच्या 'ओएसडी'चा राजीनामा

अमरिंदरसिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
CM Ashok Gehlots OSD Lokesh Sharma submitted resignation
CM Ashok Gehlots OSD Lokesh Sharma submitted resignation

जयपूर : कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद राजस्थानमध्ये उमटले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी रात्री पंजाबमधील मुख्यमंत्री पदाबाबत ट्विट केल्यानंतर पद सोडावं लागलं आहे. (CM Ashok Gehlots OSD Lokesh Sharma submitted resignation)

अमरिंदरसिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लोकेश शर्मा यांनी त्याविषयी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी एका मजबूत व्यक्तीला हतबल आणि एका कमजोर व्यक्तीला ताकद दिली जात असल्याबाबत त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 'मजबूत को मजबूर, मामूली को मग़रूर किया जाए...बाड़ ही खेत को खाए, उस फसल को कौन बचाए !!, असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

शर्मा यांचं हे ट्विट पंजाबच्या परिस्थितीवर असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. त्यामुळे अनेकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या निर्णयांवरच प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात केली. त्यावर वाद निर्माण झाल्यानं शर्मा यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर शर्मा यांनी हे ट्विट केलं होतं. 

राजीनामा देताना शर्मा यांनी म्हटलं आहे की, मी 2020 पासून ट्विटवर सक्रीय आहे. पक्षाच्या धोरणांविषयी कधीच ट्विट केलेलं नाही. अशोक गेहलोत यांच्याकडून ओएसडी पदाची जबाबदारी दिल्यानंतर कधीही कोणतंही राजकीय स्वरूपाचं ट्विट केलेलं नाही. माझ्या ट्विटमुळं पक्ष नेतृत्व व राज्य सरकार दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागतो, असं शर्मा यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, पंजाब काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आमदार सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी शिफारस केली आहे. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दिल्लीत बैठक सुरू आहे. त्यामुळं रंधवा यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा केली जाऊ शकते. पुढील काही वेळात काँग्रेसकडून रंधवा यांचे नाव अधिकृतपणे जाहीर होईल, असे सुत्रांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com