Congress President : अखेर ठरलं, राहुल गांधींनाच अध्यक्ष करा ; बैठकीत प्रस्ताव मंजूर

Congress President : गेहलोत, वासनिक यांची नावे चर्चेत असताना राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करावी, असा प्रस्ताव कॉंग्रेसने मंजूर केला आहे.
  congress president  latest news
congress president latest newssarkarnama

जयपूर: कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याबाबत अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहे. हे पद स्वीकारण्यास कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नकार दिल्यानंतर अध्यक्षपदासाठी अन्य नावाची चर्चा सुरु आहे. अशातच नवीन माहिती समोर येत आहे. (Rahul Gandhi news update )

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर असताना त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यानंतर मुकुल वासनिक (mukul wasnik) यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. गेहलोत, वासनिक यांची नावे चर्चेत असताना राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करावी, असा प्रस्ताव गेहलोत मुख्यमंत्री असलेल्या राजस्थान कॉंग्रेसने मंजूर केला आहे.

राजस्थान काँग्रेसने (Rajasthan Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अध्यक्ष (Congress President)करा, असा प्रस्ताव पारित केला आहे. पक्षश्रेष्ठींना हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

राहुल गांधींना अध्यक्ष करा, असा प्रस्ताव करणारे राजस्थान हे पहिले राज्य आहे. गेहलोक यांनी बैठकीत हा प्रस्ताव मांडला होता. अध्यक्षपदासाठी गेहलोत यांचे नाव चर्चेत असताना राहुल गांधी यांचे नावाला पसंती दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot)यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. ते राजस्थानच्या बाहेर जाण्यास इच्छुक नाहीत. राजस्थान कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची शनिवारी बैठक झाली, यात हा निर्णय घेण्यात आला. प्रदेश निवडणूक अधिकारी राजेन्द्र सिंह कुम्पावत हे या बैठकीस उपस्थित होते.

  congress president  latest news
RJD : राजदच्या बैठकीत राडा ; लालू प्रसाद यादव घेणार अंतिम निर्णय

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपची चिंता वाढली असल्याची टीका यावेळी बैठकीत करण्यात आली. कॉंग्रेसने बाबा रामदेव यांच्यावरही निशाणा साधला. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना मध्यप्रदेश प्रभारी महासचिव पदावरुन मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते जेपी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वासनिक हे अध्यक्ष होतील, अशीही चर्चा आहे.

  congress president  latest news
Dasara Melava : मैदान शिंदे गटाला मिळणार ; ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला

काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्लॅन बी वर काम सुरु आहे. अशोक गेहलोत यांनी नकार दिल्यानंतर आता मुकुल वासनिक यांना कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी पुढे केले जाऊ शकते. वासनिक यांच्याकडे पक्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. एनएसयूआईमधून त्यांनी आपला राजकीय प्रवासाला सुरवात केली आहे. काँग्रेसमधील नाराज गट (जी-२३)मधील ते प्रमुख नेते आहेत.

वासनिक यांनी याबाबत सोनिया गांधी यांना २०१९ मध्ये पत्र लिहिले होते. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुकुल वासनिक हे अनेक नेत्यांचे आवडते नेते आहेत, ते अध्यक्ष झाले असते पण काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली. आता वासनिक त्यांच्या नावाला अडचण येऊ शकणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in