बिहारमध्येही 'एकनाथ शिंदें'चा शोध; पासवानांच्या दाव्यानं खळबळ

शिवसेनेत बंड घडवून आणत एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार फोडले आहेत.
Chirag Paswan Latest News and Nitish Kumar Latest News
Chirag Paswan Latest News and Nitish Kumar Latest NewsSarkarnama

पाटणा : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला. त्यांनी शिवसेनेचे चाळीस आमदार आपल्या गटात घेत सत्ताही स्थापन केली. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत शिंदे यांनी देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता त्यांचं नाव घेऊन विविध राज्यातील राजकारण तापवलं जाऊ लागलं आहे. बिहारमध्येही हेच सुरू असल्याचं सोमवारी दिसून आलं. (Chirag Paswan Latest Marathi News)

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घटनाक्रमाशी जोडताना पासवान यांनी भाजप आणि संयुक्त जनता दलावर निशाणा साधला.

Chirag Paswan Latest News and Nitish Kumar Latest News
assembly floor test : भाजपचा जल्लोष : शिंदे सरकारकडून बहुमताचा आकडा पार

पासवान म्हणाले, भाजप आणि जदयू हे पक्षही त्यांच्यातील एकनाथ शिंदेंचा शोध घेत आहेत. एकमेकांना खाली खेचून विरोधकांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप आणि जदयू हे दोन्ही पक्ष केवळ राज्यात सत्तेसाठी एकत्र आले आहेत. वैचारिक मुद्दांवर भाजप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापुढे आत्मसमर्पण करत आहे, अशी टीकाही पासवान यांनी केली. भाजप आणि जदयूमधील युतीवर पासवान यांनी बोट ठेवत हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांतील आमदारांध्ये प्रचंड नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे.

Chirag Paswan Latest News and Nitish Kumar Latest News
बहुमत चाचणीपूर्वी ठाकरेंना मोठा धक्का; संतोष बांगरही शिंदे गटात सामील

एमआयएमचे चार आमदार राष्ट्रीय जनता दलामध्ये जाण्यात नितीशकुमार यांचेच षडयंत्र होते, असा आरोपही पासवान यांनी केला. भाजपची ताकद कमी करण्यासाठी नितीशकुमार यांनी जाणीवपूर्वक असं केलं. ओवेसी यांच्या पक्षाचे आमदार जदयूच्या संपर्कात होते. बिहारमध्ये फारसा जनाधार नसल्याने त्यांना त्यांच्या पक्षात भविष्य नव्हते, असं पासवान म्हणाले.

पण एमआयएमच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात जाण्याऐवजी आरजेडीमध्ये जाणे पसंत केले. या घटनाक्रमामागे नितीशकुमार यांचाच हात आहे. कारण आरजेडीने भाजपकडून सर्वात मोठ्या पक्षात दर्जा हिसकावून घेतल्याची टीका पासवान यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com