शपथविधीच्या एक तास आधीच वाद...काकांना शपथ घेण्यास पुतण्याचा विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. यात 43 मंत्र्याचा शपथविधी होईल.
chirag paswan opposes inclusion of pashuati kumar paras in union cabinet
chirag paswan opposes inclusion of pashuati kumar paras in union cabinet

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या विस्तारात लोक जनशक्ती पक्षात (LJP) फूट पाडणारे खासदार पशुपतीकुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांचा समावेश आहे. परंतु, त्यांचे पुतणे चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी याला जोरदार आक्षेप घेतला आहे.  

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत सुमारे 43 मंत्री आज शपथ घेतील. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल हे पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. 

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, पशुपतीकुमार पारस यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे. त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्यामुळे आणि पक्ष नेतृत्वाची फसवणूक केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यास आमचा ठाम विरोध आहे. पंतप्रधान हे त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाचाही समावेश करु शकतात. परंतु, आमच्या पक्षाचा विचार करता पारस हे आता सदस्यही नाहीत. त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्यास आमच्या याच्याशी संबंध असणार नाही. 

लोकसभा अध्यक्षांनी पारस यांना पक्षाचे संसदीय नेते म्हणून मान्यता दिली आहे. या विरोधात पक्षाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचा दाखलाही चिराग पासवान यांनी दिला आहे. पारस यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे चिराग हे भाजपपासून आणखी दुरावले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पारस हे बंधू आहेत. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग हे पक्षाची धुरा सांभाळत आहेत. चिराग यांच्याविरोधात पारस यांनी उघड बंड पुकारले होते. लोक जनशक्ती पक्षातील या फुटीमागे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हात असल्याची चर्चा सुरू आहे. आता पारस यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात होण्याची शक्यता होती. यामुळे पारस हे दिल्लीत दाखल झाले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com