काकांनी मंत्रिपदाची शपथ घेताच पुतण्या गेला उच्च न्यायालयात 

मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत 43 मंत्र्यांनी आज शपथ घेतली.
Chirag Paswan moves Delhi High Court against Speakers decision
Chirag Paswan moves Delhi High Court against Speakers decision

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार गुरूवारी झाला. या विस्तारात लोक जनशक्ती पक्षात (LJP) फूट पाडणारे खासदार पशुपतीकुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांचे पुतणे चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी शपथ घेण्याला विरोध केला होता. पण त्यानंतरही पारस यांनी शपथ घेतल्याने चिराग यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. (Chirag Paswan moves Delhi High Court against Speakers decision)  

मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत 43 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे. असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल हे पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. यामध्ये पासवान यांच्याजागी पारस यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. पण चिराग पावसान यांनी त्यावरच आक्षेप घेतला आहे.

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटले होते की, पशुपतीकुमार पारस यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे. त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्यामुळे आणि पक्ष नेतृत्वाची फसवणूक केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यास आमचा ठाम विरोध आहे. पंतप्रधान हे त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाचाही समावेश करु शकतात. परंतु, आमच्या पक्षाचा विचार करता पारस हे आता सदस्यही नाहीत. त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्यास आमच्या याच्याशी संबंध असणार नाही. 

लोकसभा अध्यक्षांनी पारस यांना पक्षाचे संसदीय नेते म्हणून मान्यता दिली आहे. या विरोधात पक्षाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचा दाखलाही चिराग पासवान यांनी दिला आहे. आता पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे चिराग हे भाजपपासून आणखी दुरावले जाण्याची शक्यता आहे. त्याची प्रचिती आजच आली आहे. पासवान यांच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. अध्यक्षांनी पारस यांना पक्षाचा संसदेतील नेता म्हणून मान्य केले आहे. या याचिकेवर गुरूवारी शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.  

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पारस हे बंधू आहेत. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग हे पक्षाची धुरा सांभाळत आहेत. चिराग यांच्याविरोधात पारस यांनी उघड बंड पुकारले होते. लोक जनशक्ती पक्षातील या फुटीमागे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हात असल्याची चर्चा सुरू आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com