'चीनची पुन्हा घुसखोरी; पण केंद्रसरकार सत्य लपवतयं'

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारने देशातील जनतेची फसवणूक करू नये
'चीनची पुन्हा घुसखोरी; पण केंद्रसरकार सत्य लपवतयं'

नवी दिल्ली : चीनने (China) भारताच्या जमीनीवर (Indian territory) कब्जा केल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. त्याबाबत कॉंग्रेसनेते राहूल गांधी यांनी अनेकदा प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे. मात्र प्रत्येकवेळी केंद्रसरकारने राहुल गांधींचे (Rahul Gandhi) हे आरोप धुडकावून लावले. जानेवारी महिन्यात चीनने भारतीय भुमीत कब्जा केल्याची माहिती समोर आली होती. मात्र तेव्हाही केंद्रसरकारने ही माहिती चूकीची असल्याचे सांगितले होते.

'चीनची पुन्हा घुसखोरी; पण केंद्रसरकार सत्य लपवतयं'
भाजपची डोकेदुखी कायम; शेतकरी संसदेवर धडक देणारच

मात्र आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी चीनने भारताच्या भुमीत सहा-सात किलोमीटर गाव वसविल्याची माहिती दिली आहे. सॅटेलाईट्च्या माध्यमातून मिळवलेले याचे सर्व पुरावे, नकाशे माझ्याकडे आहेत. जानेवारी महिन्यात चीनने भारताच्या ज्या जमीनीवर यात ६०-७० घरांचे गाव वसवले होते, तिथून पश्चिम दिशेला ९३ किलोमीटरवर चीनने पुन्हा भारताच्या भुमीत आक्रमण केल्याचा दावा सिंघवी यांनी केला आहे. अरुणाचल प्रदेशातील LAC च्या सहा किलोमीटर परिसरात बांधल्या जात असलेल्या 60 इमारतींच्या उपग्रह प्रतिमा समोर आल्यानंतर विस्तारवादी चीनच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शुत्रुराष्ट्राला भारताच्या भुमीत आक्रमण करु देणार नाही, असे आपले ५६ इंचाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते, पण जानेवारी महिन्यानंतर चीनने पुन्हा एकदा भारताच्या सीमावर्ती भागात कब्जा केल्याची माहिती सिंघवी यांनी दिली आहे. सरकारी नकाशांचे पुरावे दाखवत सिंघवी यांनी हा दावा केला आहे. या बांधकामाचा फोटो दाखवत सिंघवी यांनी, काही महिन्यांपूर्वी मोकळी असलेल्या जमीनीवर आता इमारत बनली आहे. जगातील प्रमुख एजन्सीच्या माध्यमातून हे सॅटेलाईट फोटो मिळवण्यात आल्याचे सिंघवी यांनी म्हटले आहे.

यावरुन चीन भारतीय भुभागावर घुसखोरी करत आहे, परंतु सरकार सत्य लपवत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारने देशातील जनतेची फसवणूक करू नये, असे आवाहन सिंघवी यांनी केले आहे. तसेच चीनविरोधात रणनीती बनवताना सर्वांना सोबत घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in