चीननं पुन्हा जगाला हादरवलं; दैनंदिन रुग्णसंख्येने गाठला उच्चांक

कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये आढळून आल्यानंतर दोन वर्षांपूर्वी जग हादरलं होतं. त्यानंतर बहुतेक देशांना कोरोनाचा विळखा पडला.
Lockdown in China | China Corona News Update
Lockdown in China | China Corona News UpdateSarkarnama

बीजिंग : कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये (China) आढळून आल्यानंतर दोन वर्षांपूर्वी जग हादरलं होतं. त्यानंतर बहुतेक देशांना कोरोनाचा विळखा पडला. अनेक देशांमध्ये तीन-चार लाटा येऊन गेल्या असून लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता पुन्हा एकदा चीनमधील वृत्ता जगाला हादरा बसला आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून यावेळी दोन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. (China Corona News Update)

कोरोनाचा (Covid-19) संसर्ग वेगाने वाढू लागल्याने चीनमधील प्रमुख शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. चीनमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. मागील 24 तासांत 5 हजार 280 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून एका दिवसांत आढळलेली ही चीनमधील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंघावू लागले आहे. (China Covid Wave News updates)

Lockdown in China | China Corona News Update
दम असेल तर माझ्याशी लढा! एलॉन मस्क रणांगणात अन् थेट पुतीन यांच्याशी घेतला पंगा

चीनमधील जिलिन प्रांतांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 10 शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले असून शेंझेंन या टेक हबमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. लॉकडाऊनमुळे जवळपास 1 कोटी 70 लाख नागरिक घरातून बाहेर पडू शकत नाहीत. शेझेंन आणि शांघाय या मोठ्या शहरात कोरोनाविषयक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चीनमध्ये शनिवारी रुग्णसंख्या 1 हजार 524 होती.

कोरोना संसर्गाचे हे प्रमाण मागील दोन वर्षातील अधिक तीव्र आहे. यामुळे प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांनी घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. सर्व प्रौढांना तीन पीसीआर चाचण्या करण्यास सांगितले आहे. शांघायमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला असून, शहरातील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

मागील आठवडाभरात देशातील रोजची सरासरी रुग्णसंख्या आता 1 हजार 370 वर पोचली आहे. रॅपिड अँटिजेन चाचणीचे किट सार्वजनिकरीत्या वापरासाठी उपलब्ध करून देणे आणि आरोग्य यंत्रणांचे सुस्तावलेले वरिष्ठ अधिकारी यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा दावा करणयात आला आहे. शेंझेनमध्ये एका आठवड्याचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. संपूर्ण लॉकडाऊन टाळावे, अशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात येत आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला धोका बसण्याची शक्यता आहे. असे असले तरी निर्बंध लादणाऱ्या शहरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com