कोरोना नव्हे तर लॉकडाउनची धास्ती! चीनमधील जनता अखेर हतबल

चीनमधील नागरिकांचे लॉकडाउनमुळे प्रचंड हाल
Lockdown in China | China Corona News Update
Lockdown in China | China Corona News UpdateSarkarnama

बीजिंग : चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाने (Covid-19) हाहा:कार माजवला आहे. राजधानी बीजिंग आणि व्यापारी केंद्र शांघाय येथे निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. लॉकडाउनमुळे (Lockdown) लाखो लोक घरात बंदिस्त आहेत. काही भागात तर खाद्यपदार्थांच्या डिलिव्हरीसही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू असून, जनतेत रोष वाढत आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी चीनकडून कठोर उपाययोजना सुरू आहेत. चीनच्या झिरो कोविड धोरणावरही आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शांघायमध्ये मागील दीड महिन्यांपासून लॉकडाउन आहे. संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. शांघायच्या 16 जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यात लॉकडाउनच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

Lockdown in China | China Corona News Update
श्रीलंकेत आगडोंब! हिंसाचारानंतर माजी पंतप्रधान कुटुंबीयांसह नौदल तळावर लपले

नागरिकांना परवानगीशिवाय घराबाहेर न पडण्याची तंबी देण्यात आली आहे. ते सामानाची डिलिव्हरीही स्वीकारू शकत नाहीत. यापूर्वी घराच्या परिसरात फिरण्याची नागरिकांना मुभा होती. शांघायमध्ये या नवीन निर्बंधांच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. हे निर्बंध हे तुरुंगात राहण्यासारखे आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आम्हाला कोरोनाची नाही तर लॉकडाऊनची भीती वाटते, अशा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

Lockdown in China | China Corona News Update
अडचणीत आलेल्या नारायण राणेंची अटक पुन्हा टळली

चीनची राजधानी बीजिंगमध्येही कोरोनाचे कडक निर्बंध लागू झाले आहेत. नैऋत्य बीजिंगमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक इमारती आणि बागा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या लाटेचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. चीनची निर्यातवाढ ही दोन वर्षातील नीचांकी पातळीवर आहे. अर्थव्यवस्थेच्या अन्य क्षेत्रावर कोरोनाच्या निर्बंधाचा प्रतिकूल परिणाम जाणवत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com