कोरोनाच्या उद्रेकानंतरचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा लॉकडाऊन चीनमध्ये लागू

चीनमध्ये (China) कोरोनाचा (Covid-19) उद्रेक झाल्यापासून दोन वर्षांतील सर्वांत कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे.
China Lockdown

China Lockdown

Sarkarnama

बीजिंग : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढलं आहे. जगभरात ओमिक्रॉन अतिशय वेगाने पसरू लागला आहे. चीनमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. याचवेळी चीनमध्ये (China) कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून दोन वर्षांतील सर्वांत कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे.

शियान शहरात हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या शहराची लोकसंख्या 1 कोटी 30 लाख आहे. शहरातील सर्व नागरिकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले असून, त्यांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक घरातील केवळ एकाच व्यक्तीला गरजेच्या गोष्टी घेण्यासाठी दिवसाआड बाहेर पडता येईल. अनावश्यक कामासाठी शहरात प्रवास करता येणार नाही. चीनमध्ये नुकतीच मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात 14 जिल्ह्यांत 127 रुग्ण सापडले होते.

चीनमध्ये सध्या सुटीचा हंगाम आहे. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सहलीचे बेत आखत आहेत. याचबरोबर हिवाळी ऑलिम्पिकची जोरदार तयारी सुरू आहे. हे ऑलिम्पिक फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. चीनमध्ये डेल्टा विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. आता ओमिक्रॉनचा प्रसार वाढू लागला आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांमध्येही ओमिक्रॉन संसर्गाचे प्रमाण लक्षणीय असल्याने चीनची चिंता वाढली आहे.

<div class="paragraphs"><p>China Lockdown</p></div>
ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत 24 तासांत 18 टक्के वाढ; मोदी आज मोठी घोषणा करणार

बिल गेट्स यांचा जगाला धोक्याचा इशारा

दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना नुकताच जगाला ओमिक्रॉनबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, जगभरात ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग चिंताजनक आहे. यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर माझी पूर्वनियोजित सहलही मी अखेर रद्द केली आहे. माझ्या जवळच्या मित्रांना विषाणूची बाधा झाली आहे. आता कुठे आपले आयुष्य रुळावर आले होते. परंतु, लगेचच आपण कोरोना महामारीच्या सर्वांत वाईट कालखंडात प्रवेश करीत आहोत. प्रत्येकाच्या घरात ओमिक्रॉन धडकणार आहे.

ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने पसरत आहे. विषाणूंच्या इतिहासात आतापर्यंत एवढ्या वेगाने कोणत्याही विषाणूचा प्रसार झाला नव्हता. तो लवकरच प्रत्येक देशात पोचेल. ओमिक्रॉनमुळे तुमच्या शरीरावर किती परिणाम होतो, हे अद्याप समोर आलेले नाही. आतापर्यंत तो सर्वांत संसर्गजन्य असल्याचे समोर आले आहे, असे गेट्स यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com