
New Delhi News: चीनकडून भारतीय भू-भाग व्यापला जात असल्याचा आरोप काँग्रेस गेल्या काही महिन्यांपासून करत आहे. अशातच चीनच्या घुसखोरीबाबत खासदार राहुल गांधींनी पुन्हा एकदा भूमिका मांडून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
दिल्ली विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं. "चीनने भारतीय जमिनीवर घुसखोरी केली आहे. चीनने नुकताच एक अधिकृत नकाशा जारी करून, या नवीन नकाशात भारताचे पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश आणि चीनच्या हद्दीतील अक्साई चिन क्षेत्र दाखवले आहे. चीन सरकारने २८ ऑगस्ट रोजी हा नकाशा जारी केला. ही बाब गंभीर असून केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.
चीनने भारतीय भू-भागांवर घुसखोरी केली नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पण हे पूर्णपणे खोटं आहे. चिनी सैन्याने घुसखोरी करून भारतीय भू-भागावर कब्जा केलाय हे तेथील स्थानिक लोकांनाही माहिती आहे, असाही दावा राहुल गांधींनी केला आहे .
त्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर यांनी भारतीय भूभाग स्वतःचा असल्याचा चीनचा दावा साफ फेटाळून लावला आहे.तसेच "ही चीनची जुनी सवय आहे. त्यांच्या दाव्याने काहीही होत नाही. चीनने नकाशात जे क्षेत्र स्वतःचे म्हणून दाखवले आहेत ती क्षेत्रे त्यांची नाहीत.पण भारतीय जमिनीवर दावा करण्याची चीनची जुनी सवय आहे. अक्साई चीन आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. यापूर्वीही चीन भारताच्या काही भागांचे नकाशे काढत आहे. त्याच्या दाव्याने काहीही होत नाही. आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. भारतीय भू-भाग तुमचा होईल, असा निरुपयोगी दावे करून होत नाही.
दरम्यान, चीनने सोमवारी आपला अधिकृत नकाशा प्रसिद्ध करत भारताचा अरुणाचल प्रदेश,अक्साई चीन,तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्र आपल्या हद्दीत दाखवला आहे. इतकेच नव्हे तर,चीनच्या अधिकृत वृत्तपत्रानेही ट्विटरवर नवीन नकाशा पोस्ट केला.चीन आणि जगातील वेगवेगळ्या देशांच्या सीमा रेखाटण्याच्या पद्धतीच्या आधारे हा नकाशा तयार करण्यात आला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.