Old Pension Scheme : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

विधानसभा निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा गाजला
Old Pension Scheme
Old Pension Scheme

Old Pension Scheme : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखबिंदर सिंग सुखू यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मुख्यमंत्री सुखबीर सिंह सुखू यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सुखबिंदर सिंग सुखू यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जुनी पेन्शन योजना (OPS) हा मोठा मुद्दा बनला होता.

निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्री सखू यांनी ट्विट करत याबाबत घोषणा केली आहे. "काँग्रेसची विचारधारा ही प्रेम, बंधुता आणि सत्याचे उदाहरण आहे. आज, लोहरीच्या शुभ मुहूर्तावर, हिमाचल प्रदेशातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेची प्रलंबित मागणी पूर्ण करताना मला खूप आनंद होत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की कर्मचारी हिमाचलच्या विकासासाठी सरकारच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण सहकार्य करतील.

Old Pension Scheme
Pune Congress : पुणे काँग्रेसमधला वाद; शहराध्यक्षानाच संघटनेच्या कामाची माहिती नसल्याचा आरोप

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन मोठे मुद्दे समोर आले होते. हे मुद्दे सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बहाल करण्याचा आणि दुसरा मुद्दा अग्निवीर भरती योजनेचा होता. यातून जुन्या बरीच चर्चा झाली. राज्यात आपले सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करू, असे आश्वासन काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना दिले होते. आता सीएम सखू यांनी आपले आश्वासन पूर्ण केले आहे.

विधानसभा निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा इतका गाजला की राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रेमकुमार धुमल यांनीही जुन्या पेन्शन योजनेची बाजू मांडली. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर देशाची आणि राज्याची सेवा केली त्यांना सन्माननीय पेन्शन मिळावी, असे धुमल म्हणाले होते

दरम्यान, जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारी कर्मचारी उपोषणाला बसले होते. राज्यात सुमारे 4 लाख सरकारी कर्मचारी आहेत, पेन्शनधारकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या छोट्या राज्यातील निवडणुकीदरम्यान हा मुद्दा बराच गाजला होता. पण आता मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com