मुख्यमंत्री शिंदे अन् संभाजीराजेंची दिल्लीत भेट; मराठा आरक्षणावर झाली चर्चा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
Eknath Shinde, Sambhajiraje Latest Mews
Eknath Shinde, Sambhajiraje Latest MewsSarkarnama

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपती (Chhtrapati Sambhajiraje) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याबाबतची माहिती स्वत: संभाजीराजेंनी दिली आहे. (Eknath Shinde, Sambhajiraje Latest Mews)

Eknath Shinde, Sambhajiraje Latest Mews
डोळे काढेन.. म्हणता एवढी हिंमत आहे का तुमच्यात?; पेडणेकरांचं राणेंना आव्हान

संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माझ्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी नुकताच शासनाने जीआर काढल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन केले, व उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती करिता समन्वय साधण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र डेस्क सुरू करावा, अशी मागणी केली. तसेच, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.

गडकोटांचे संवर्धन, मुंबई ते किल्ले रायगड असे सी, फोर्ट सर्किट टूरिझम, पर्यटन विकास या विषयांवर देखील सकारात्मक चर्चा झाली. हे वर्ष राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करावी, अशी देखील मागणी केली.

Eknath Shinde, Sambhajiraje Latest Mews
उद्धव ठाकरे जगातील 'ढ' माणूस...राणेंची टीका

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे विचार-कार्य जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य शासनातर्फे विशेष उपक्रम राबवावेत, अशी संकल्पना मांडली. यावेळी त्यांच्यासह मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, हेमंत पाटील, अभिजीत अडसूळ, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव उपस्थित होते.

दरम्यान, या आधी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजे मंत्रालयात गेले होते. मात्र, मुख्यमंत्री व्यस्त असल्याने त्यांना संभाजीराजेंना वेळ देता आला नव्हता. यावरून नाराजी व्यक्त करीत संभाजीराजे मंत्रालयातून बाहेर पडले होते आणि त्यांच्या नाराजीच्या बातम्या आल्या होत्या यानंतर शिंदेंनी संभाजीराजेंशी संपर्क साधत मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांना तातडीने भेटण्यासाठी वेळ दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com