ठाकरे-बॅनर्जींना ओव्हरटेक करत केसीआर यांनी घेतली आघाडी; तिसऱ्या आघाडीचा चेहरा होणार?

Uddhav Thackeray | Mamata Banerjee | KCR : तिसऱ्या आघाडीची तयारी जोरात...
Uddhav Thackeray | Mamata Banerjee | KCR
Uddhav Thackeray | Mamata Banerjee | KCRSarkarnama

बंगळुरू : तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी आज माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (former Prime Minister HD Deve Gowda) यांची बंगळुरुमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. (HD Kumaraswamy) कुमारस्वामी देखील उपस्थित होते. आगामी प्रस्तावित तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर के. चंद्रशेखर राव यांची ही भेट अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. (K Chandrashekar Rao latest News)

दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांनी या भेटीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ओव्हरटेक केल्याची चर्चा आहे. कारण उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असतानाच के. चंद्रशेखर राव यांनी एक माजी पंतप्रधान आणि तब्बल सहा आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपली दावेदारी भक्कम केली आहे. त्यांनी नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर-प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली. तसेच यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती.

Uddhav Thackeray | Mamata Banerjee | KCR
नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा ठेंगा दाखवत मुख्यमंत्री पोहचले माजी पंतप्रधानांच्या भेटीला

या भेटीनंतर के. चंद्रशेखर राव म्हणाले, आम्ही राष्ट्रीय आणि कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. आज देशाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्य जनता, आदिवासी यांपैकी देशात कोणीही आनंदी नाही. अनेक आश्वासन दिली जातात, पण उद्योग बंद होत आहेत, महागाई वाढत आहे. इतिहासात पहिल्यांदाच रुपायाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे, ही सत्य परिस्थिती आहे.

Uddhav Thackeray | Mamata Banerjee | KCR
संभाजीराजे छत्रपती मन मोकळं करणार; मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत

आपल्यापेक्षा कमी जीडीपी असलेल्या चीनची १६ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनली आहे, आणि आपण ५ ट्रिलीयन डॉलरची स्वप्न बघतं आहे. पण देशात जर मन लावून काम केले तर आपली अमेरिकेपेक्षा मोठी अर्थव्यवस्था बनु शकते, असेही राव म्हणाले. तर एचडी कुमारस्वामी म्हणाले, के चंद्रशेखर राव हे मागील काही काळापासून तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या राज्यात जावून अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यांना आपला देश वाचवायचा आहे आणि यात बदल आणायचे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com