Arvind Kejriwal News: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केजरीवाल अ‍ॅक्शन मोडवर; घेतला मोठा निर्णय

Delhi Govt vs LG case Verdict : अनेक अडचणी असतानाही आम्ही लढत राहिलो; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal NewsSarkarnama

Delhi Govt: सुप्रीम कोर्टाने आज दोन महत्वाचे निर्णय दिले. यामध्ये एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दलचा निर्णय आणि दिल्लीतील प्रशासकीय सेवांच्या नियंत्रणाबद्दलचा एक निर्णय दिला. दिल्लीतील प्रशासकीय सेवांच्या नियंत्रणाचा आधिकार दिल्ली सरकारलाच आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे दिल्ली सरकारला मोठा दिलासा मिळाला.

दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यामध्ये दिल्लीतील प्रशासकीय सेवांच्या नियंत्रणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं.

Arvind Kejriwal News
Delhi Govt Vs LG : दिल्ली केजरीवालांचीच ! ; न्यायालयाचा मोदींना दणका ; बदल्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडून आलेल्या..

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. दिल्ली सरकारने सेवा विभागाचे सचिव आशिष मोरे यांना हटवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

Arvind Kejriwal News
Imran Khan News: माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर; तातडीने सोडा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की, या निर्णयानंतर आता दिल्लीत कामाला गती येईल. याआधी आमचे हात बांधलेले होते. जनतेच्या कामात अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांना येत्या काही दिवसांत परिणाम भोगावे लागतील. अनेक अडचणी असतानाही आम्ही लढत राहिलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com