सरन्यायाधीश यू यू ललित अ‍ॅक्शन मोडमध्ये : 4 दिवसात 1800 प्रकरणांचा निकाल

CJI UU LALIT : मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जास्तीत जास्त खटले निकाली काढण्याचा असेल..
CJI U.U. Lalit
CJI U.U. LalitSarkarnama

नवी दिल्ली : न्यायमूर्ती उदय उमेश ललित (CJI UU LALIT) यांनी अलीकडेच भारताच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांची सरन्यायाधीशपदी निवड झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अवघ्या चार दिवसांत तब्बल 1800 हून अधिक खटले निकाली काढले आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात ललित यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या कामगिरीची माहिती दिली. (Latest Marathi News)

CJI U.U. Lalit
मोठी बातमी : नीतीशकुमार घेणार शरद पवारांची भेट; विरोधकांची रणनीती ठरणार

उपस्ठित वकिलांना संबोधित करताना ललित म्हणाले, “गेल्या चार दिवसांत घडलेली एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आम्ही ज्या प्रकरणांची यादी करत आहोत, ते मी पदभार स्वीकारण्यापूर्वीच्या प्रकरणांपेक्षा फार जास्त आहेत. माझ्या सचिवांनी समोर आकडे ठेवले आहेत. गेल्या चार दिवसांत न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणांची एकूण संख्या १२९३ इतकी जास्त होती.

1293 प्रकरणांपैकी 493 प्रकरणे 29 ऑगस्ट रोजी निकाली काढण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून यू यू ललित यांचा हा पहिला दिवस होता. यानंतर शुक्रवारी 315 प्रकरणांवर निकाल सुनावण्यात आले. त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आणि गुरुवारी अनुक्रमे 197 आणि 228 प्रकरणे निकाली काढली. गणेश चतुर्थीनिमित्त बुधवारी सर्वोच्च न्यायालय बंद होते.

CJI U.U. Lalit
Manipur : भाजपचा जेडीयूला धोबीपछाड, पाच आमदार सोडणार पक्ष

आपल्या भाषणादरम्यान न्यायमूर्ती यूयू ललित यांनी एका मुद्द्यावर विशेष लक्ष वेधले. ललित म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात नियमितपणे 106 प्रकरणांचा दोन दिवसांत निर्णय घेऊ शकते. तीन न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर नियमित सुनावणीच्या प्रकरणांमध्ये विस्तृत युक्तिवाद आवश्यक आहेत. मंगळवार ते गुरुवार दरम्यान नियमित सुनावणीसाठी असलेल्या प्रकरणांची यादी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आली आहे. अशा 58 प्रकरणांवर मंगळवारी निर्णय झाला, तर 48 प्रकरणे गुरुवारी निकाली काढण्यात आली. सरन्यायाधीश ललित म्हणाले, "आपण कल्पना करू शकता की न्यायालये आता नियमित खटले निकाली काढण्यावर अधिक भर देत आहेत."

न्यायालयाने सोमवारपासून 440 हस्तांतरीत याचिकाही निकाली काढल्या आहेत. मंगळवार आणि गुरुवारी मोठ्या प्रमाणात हस्तांतरीत याचिकांवर निकाल देण्यात आला. न्यायमूर्ती ललित म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालय शक्य तितक्या खटल्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करेल आणि सरन्यायाधीश म्हणून 74 दिवसांच्या आपल्या अल्प कार्यकाळात लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. जेव्हा मी पदभार स्वीकारला, तेव्हा प्रत्येक नजर मला एकच गोष्ट सांगत होती. 'साहेब, आम्हाला तुमच्याकडून खूप आशा आहेत.'

मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. जास्तीत जास्त खटले निकाली काढण्याचा सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करेल," असे ललित म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in