Supreme Court hearing : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वाचले मराठीतील पत्र; काय घडले न्यायालयात...

Shivsena : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरुवात झाली आहे.
Supreme Court hearing
Supreme Court hearingSarkarnama

Supreme Court hearing : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरुवात झाली आहे. आज सुनावणीच्या दुसऱ्या दिवशीही ठाकरे गटाकडून अ‌ॅड. कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत.

सिब्बल यांनी सांगितले की ''उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख असताना शिवसेनेच्या कार्यकारिणीबद्दलची माहिती घटनापीठाला दिली. ठाकरे यांच्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पद चौथ्या क्रमांकावर होते. या पदावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांची नेमणूक केली होती. पक्षाचे सर्व निर्णय उद्धव ठाकरेच घेत होते, असेही सिब्बल यांनी सांगितले.

Supreme Court hearing
Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली; सिब्बलांचा जोरदार युक्तीवाद : न्यायधीशांची महत्त्वाची टिप्पणी

शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती तर शिवसेनेचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनीच ही नियुक्ती केली होती.

व्हीपचा निर्णय पक्षच घेऊ शकतो, असे सिब्बल म्हणाले. 25 नोव्हेंबर 2019 ला उद्धव ठाकरे हे आमदार ही नव्हते. मुख्यमंत्रीही ही नव्हते. ते फक्त शिवसेनेचे अध्यक्ष होते. पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना यांनाच होता. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार ठाकरेंना देण्यात आले होते.

सिब्बल यांच्या या युक्तिवादानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, ही बैठक फक्त निवडून आलेल्या आमदारांची होती. शिवसेनेत मुख्य प्रतोद याची निवड कशी होते?, असा प्रश्न आला. त्यावर शिवसेनेचे पत्र मराठीमध्ये होते, ते पत्र शिवसेनेच्या ठरावाचे वाचन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्वत: केले. विशेष म्हणजे हा ठराव मराठीत असून मराठीतून चंद्रचूड यांनी त्याचे वाचन केले.

Supreme Court hearing
Supreme Court hearing : कपिल सिब्बलांचे मुद्दे महत्त्वाचे; न्यायालयासमोरच पेच : काय म्हणाले न्यायमूर्ती?

काल झालेल्या सुनावणीमध्ये पहिल्या दिवशी ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी झालेली निवडच चुकीची असल्याचा दावा केला होता. राहुल नार्वेकर यांनी घेतलेले सर्व चूकीचे आहेत. विधानसभा अध्यक्षांबाबत सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असल्याचे निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मांडले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com