छोटा शकील म्हणतो, दाऊद कुठंय हे तुम्हीच दाखवा...

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याची कबुली पाकिस्तानने दिली होती. यानंतर पाकिस्तानने याचा इन्कार केला होता. आता दाऊदचा साथीदार छोटा शकील याने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
chhota shakeel clarifies about reports of dawood ibrahim living in pakistan
chhota shakeel clarifies about reports of dawood ibrahim living in pakistan

इस्लामाबाद : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असल्याची धक्कादायक कबुली पाकिस्तानने दिली होती. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार पाकिस्तानमध्ये लपून बसल्याचा भारताने जागतिक पातळीवर सातत्याने केलेला दावा खरा ठरला होता. मात्र, नंतर पाकिस्तानने त्याचा इन्कार केला होता. आता दाऊदचा विश्वासू साथीदार छोटा शकील याने या प्रकरणी मोठा खुलासा केला आहे.   

दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यात येत आहे. पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत मागील काही काळात कमी करण्यात आली आहे. याचबरोबर ही मदत रोखण्याचा इशाराही देण्यात आला होता. जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्याची मोहीम सुरू आहे. आर्थिक नाड्या आवळण्यात आल्याने अखेर पाकिस्तानने देशातील 88 दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांवर निर्बंध लादले आहेत. यात हाफीज सईद, मसूज अजहर आणि दाऊद इब्राहिम यांचा समावेश आहे. या निर्बंधानुसार दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांची सर्व मालमत्ता आणि बँक खाती गोठविण्यात येणार आहे. 

पॅरिसस्थित फायनान्शियल टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला जून 2018 मध्ये ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. याचबरोबर 2019 च्या अखेरपर्यंत दहशतवाद्यांवरील कारवाईचा कृती आराखडा सादर करण्यास सांगितले होते. कोरोनाच्या महामारीमुळे ही मुदत नंतर वाढविण्यात आली होती. पाकिस्तान सरकारने 18 ऑगस्टला दोन अधिसूचना काढल्या आहेत. यात 88 दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यात मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद, जैशे महंदमचा प्रमुख मसूद अजहर आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या समावेश आहे. 

पाकिस्तान सरकार या दहशतवाद्यांची सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करणार आहे. याचबरोबर वित्तीय संस्थांमधून या दहशतवाद्यांना पैसे हस्तांतर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर त्यांना परदेशातही प्रवास करता येणार नाही. तसेच, तेहरिके तालिबान या अफगाणिस्तान सीमेवरील दहशतवादी संघटनेचे सर्व म्होरके आणि सदस्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. दाऊद पाकिस्तानातच असल्याचे वृत्त आल्यानंतर गदारोळ उडाला होता. पाकिस्तानने याचा इन्कार केला होता. 

आता दाऊदचा साथीदार छोटा शकील याने या प्रकरणी खुलासा केला आहे. त्याने 'सीएनएन-न्यूज18'शी बोलताना म्हटले आहे की, दाऊद हा कराचीतील क्लिफ्टन भागात राहत असल्याचे दाखविण्याची जबाबदारी भारतीय माध्यमांनी घेतली आहे. आम्ही मात्र, कोणत्याही सरकारला उत्तर देण्यास बांधील नाही मग तो पाकिस्तान असो अथवा भारत. आम्ही कराचीमध्ये राहत नाही. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या युगात तुम्ही काहीही दाखवू शकता. तुम्ही बंगला आणि कारही त्याची असल्याचे दाखवू शकता. तुम्ही दाऊदचे इब्राहिमचे घर दाखवत असाल तर ते सिद्ध करणे ही तुमचीच जबाबदारी आहे, आमची नव्हे. काहीही दाखविण्यास तुम्ही मोकळे आहात. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com