एलपीजी सिलिंडर 500 रुपयांच्या आतच मिळणार! मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) महागाईचे चटके जनतेला बसत आहेत.
LPG Cylinder
LPG CylinderSarkarnama

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीसोबत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) महागाईचे चटके जनतेला बसत आहेत. यावर आता छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी 500 रुपयांच्या आत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन उत्तराखंडमधील जनतेला दिले आहे.

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसने (Congress) आज या निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात काँग्रेसने सत्तेत आल्यास एलपीजी सिलिंडर 500 रुपयांच्या आतच देण्याचे मोठे आश्वासन दिले आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री बघेल म्हणाले की, उत्तराखंडमध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही आमच्या जाहीरनाम्यात एलपीजी सिलिंडर 500 रुपयांच्या पुढे जाऊ न देण्याचे आम्ही आश्वासन दिले आहे.

या कार्यक्रमाला बघेल यांच्यासह प्रचारप्रमुख हरीश रावत, विरोधी पक्षनेते प्रितमसिंह, प्रदेशाध्यक्ष गणेश गोडियाल आणि हरकसिंह रावत आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बघेल म्हणाले की, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर मोदी सरकार गप्प आहे. राज्यातील बेरोजगारीचा दर हा राष्ट्रीय बेरोजगारी दरापेक्षा जास्त आहे. मागील वेळी जनतेने भाजपला बहुमत दिले होते. मात्र, भाजपने राज्याला 5 वर्षांत तीन मुख्यमंत्री दिले आहेत. याचबरोबर भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाईने भाजपने वाढवली आहे. आता राज्यातील जनतेला भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे.

LPG Cylinder
अन्वय नाईक आत्महत्या अन् पोलिसांच्या बदल्यांवरून देशमुखांची झाडाझडती

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच सिलिंडर दरवाढीची भर पडत आहे. देशात विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत आता 900 रुपयांवर गेली आहे. मागील वर्षी जुलैपासलून एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 100 रुपयांची वाढ झालीआहे. दरवाढीमुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला यामुळे आणखी चटके बसत आहेत.

LPG Cylinder
असंही राजकारण; पत्नी भाजपमध्ये गेल्यानं काँग्रेसच्या आमदाराचा पत्ता कट?

जनतेच्या खिशाला कात्री

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in