महाराष्ट्र सदनातील भुजबळांच्या खोलीचे लाॅक उघडेना...

छगन भुजबळांना महाराष्ट्र सदनातील गैरव्यवस्थापनाचा फटका; महाराष्ट्र सदनात तब्बल अर्धा तास ताटकळत राहावे लागले
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) पुन्हा मिळावे, यासाठी न्यायालयीन लढाईसाठी दिल्लीत पोचलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नव्या महाराष्ट्र सदनातील गैरव्यवस्थापनाचा फटका बसला आहे. नवीन महाराष्ट्र सदनातील रुमचे लॉक उघडत नसल्याने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना तब्बल अर्धा ते पाऊण ताटळकत उभे राहावे लागले. याबाबतचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. (Chhagan Bhujbal had suffer due to mismangament in maharashtra Sadan)

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जाहीर झालेल्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका एक तर संपूर्णपणे घ्या किंवा संपूर्णपणे थांबवा, अशी मागणी करत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यासंदर्भात राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे दिल्लीत गेले आहेत. ही न्यायालयीन लढाई लढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने भुजबळ हे दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत.

Chhagan Bhujbal
राऊत थांबेनात; योगींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करत पुन्हा वापरला तोच शब्द...

दरम्यान, छगन भुजबळ हे दिल्लीतील नवीन महाराष्ट्रात सदनात उतरले आहेत. त्या ठिकाणीच ते विविध मान्यवरांशी या मुद्यावर चर्चा करत आहेत. तेथून ते आरक्षणाच्या लढाईची सूत्रे हलवीत आहेत. मात्र, त्यांना गुरुवारी (ता. ९ डिसेंबर) महाराष्ट्र सदनातील गैरव्यवस्थापनाचा फटका बसला आहे. सदनातील १५६ खोली क्रमांकाचा दरवाजा तब्बल अर्धा ते पाऊण तास उघडत नव्हता, त्यामुळे भुजबळ यांनाही तेवढा वेळ ताटकळत उभे राहावे लागले. या खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी सदनातील कर्मचारी खटाटोप करत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे छगन भुजबळ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच हे नवीन महाराष्ट्र सदन बांधण्यात आलेले आहे. याच इमारतीच्या बांधकामामध्ये गैरकारभार झाल्याचा आरोप भुजबळांवर झाला होता. त्यांना त्यावरून तब्बल वर्षभर तुरुंगवासही भोगावा लागला आहे. तेथील गैरव्यवस्थापनाचा फटका आज खुद्द भुजबळ यांनाच बसला आहे.

Chhagan Bhujbal
भुजबळ दिल्लीत ठाण मांडून: राज्य सरकारची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव

याबाबत माजी खासदार आणि भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, असा कोणताही प्रकार घडलेला नाही. आम्ही गप्पा मारत उभे होतो. आमच्या बरोबरच्या एकाचे लॉकचे कार्ड आत राहिले होते. मात्र, त्यामुळे छगन भुजबळ यांना कोणताही त्रास झालेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com