चरणजित सिंग चन्नी अमित शहांना भेटणार

केंद्रिय कृषी कायद्यांबाबत करणार महत्त्वाची मागणी.
चरणजित सिंग चन्नी
चरणजित सिंग चन्नीsarkarnama

उत्तरप्रदेशातील (Uttarpradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Khiri) घटनेचे देशभर पडसाद उमटल्याचे दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Panjab CM Charanjitsingh Channi) यांनी आपला राजस्थान दौरा रद्द केला. आज (५ ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता जयपूर येथील मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajsthan CM Ashok Gehlot) यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री चन्नी यांच्यासाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भेटीदरम्यान, पंजाब आणि राजस्थान मध्ये सुरू असलेल्या वादांवर चर्चा होणार होती. मात्र हा दौरा अचानक रद्द करण्यात आला.

चरणजित सिंग चन्नी
'भाजपचा हा माज जनतेनेच उतरवला पाहिजे'

दरम्यान, लखीमपूर हिंसाचार, प्रियंका गांधीची अटक यामुळे देशभरातील वातावरण चिघळले आहे. या पार्श्वभुमीवर आज चरणजीत सिंह चन्नी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ते दिल्लीला रवाना होतील. जिथे त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होईल. केंद्रिय कृषी कायदे आणि पंजाबची सुरक्षा यावर चर्चा केली जाईल.

"आज देशातील शेतकरी अस्वस्थ आहेत, शेतकरी मरत आहेत. केंद्र सरकारने त्वरित तीनही केंद्रिय कृषी कायदे रद्द करावे आणि देशात होणाऱ्या हिंसक घटना थांबवाव्यात (लखीमपूर). मी या प्रकरणासाठी दिल्लीला जात आहे आणि गृहमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करणार आहे,'' असे माहिती चरणजितसिंह चन्नी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील रावी-बियास नदीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. 1955 मध्ये, राज्यांच्या सहमतीने, केंद्र सरकारने रावी आणि बियास नद्यांचे पाणी राजस्थान, पंजाब आणि जम्मू -काश्मीरमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आजपर्यंत तीन राज्यांमध्ये पाण्याच्या वितरणाबाबत वाद सुरू आहे. हरियाणाबरोबरच पंजाब आणि राजस्थान यांच्यात पाण्याच्या वाटणीबाबतचे वाद आतापर्यंत सुटलेले नाहीत.

नवे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी राज्याच्या सर्व गंभीर प्रश्नांवर वेगाने काम करत आहेत. मंगळवारी चन्नी यांचा राजस्थान दौरा या मुद्द्यांवर निश्चित करण्यात आला होता, परंतु लखीमपूर घटनेवर देशव्यापी निदर्शने आणि लखनऊमध्ये प्रियांका गांधींच्या अटकेनंतर चरणजित सिंह चन्नी यांनी राजस्थान दौरा रद्द केला. याबाबत मुख्यमंत्री चन्नी यांनी सकाळीच राजस्थान प्रशासनाला पत्र पाठवत याची माहिती दिली. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ट्विट करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासोबत आयोजित केलेला भोजनाचा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com